एखादा माणूस आवडीने आणि मोठ्या चोखंदळपणाने जेवायला बसावा पण त्याच्या पहिल्याच घासाला खडा लागावा किंवा पहिल्या घासाला माशी लागावी अशी नरेश अग्रवाल यांची अवस्था झाली आहे. ते काल समाजवादी पार्टीतून भाजपात आले आणि आपण हे पक्षांतर का केले आहे याचे विवरण करताना ते महिला वर्गाला आणि कलावंतांना बोचेल असे विधान करून गेले. त्यामुळे सर्वसाधारण सगळ्याच […]
राजकारण
राजकारण
तेलुगु देसमचा धक्का
केन्द्रीय मंत्रिमंटडळातील तेलुगु देसमचे दोन मंत्री आपल्या पदांचे राजीनामे देतील अशी घोषणा पक्षाचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. केन्द्र सरकारने आंध्राला विशेष दर्जा दिल्याची घोषणा करावी अशी त्यांची मागणी होती पण सरकार त्याला तयार नाही. त्यामुळे तेलुगु देसम पक्षाने हा निर्णय घेतला आहे. केन्द्रातल्या सरकारचा घटक पक्ष असलेल्या तेलुगु देसम […]
गुजरातेत पुन्हा भगवा
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले असले तरीही ते अपेक्षेप्रमाणे नव्हते. राहुल गांधी यांनी प्रचाराचा मोठा धुरळा उडवून देऊन भाजपाला जेरीस आणले होते. तेव्हापासून कॉंग्रेसच्या नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आणि त्यांनी २०१९ साली केन्द्रात मित्र पक्षांच्या मदतीने सत्तेवर येण्याची स्वप्नेही पहायला सुरूवात केली. राहुल गांधी आता सुधारले आहेत आणि ते आता देशाचे नेतृत्व करू शकतील अशीही […]
समय बडा बलवान
सोलापूर आणि लगतच्या जिल्ह्यांत सध्या माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे एक छायाचित्र मोठ्या चर्चेचा विषय झाले आहे. या छायाचित्रात ते केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हार घालत आहेत आणि त्यांच्या पाया पडताना दिसत आहेत. कोणीतरी ते छायाचित्र आपल्या स्मार्टफोनने टिपले आणि ते तासाभरात व्हायरल झाले. त्या दिवशी गडकरी आणि मुख्यमंत्री असे […]
नेत्यांचे चारित्र्य आणि तैलचित्रे
नेत्यांची छायाचित्रे आणि तैलचित्रे विधानसभा आणि संसदेच्या सभागृहात लावण्याचा प्रघात आहे. मात्र अशी छायाचित्रे लावण्यापूर्वी वाद होतात. संबंधित नेत्यांचे अनुयायी बहुमतात असतात किंवा सत्तेत असतात तेव्हा मात्र नेत्याचे तैलचित्र लावले जाते. भारताच्या संसदेत स्वा. सावरकर यांचे तैलचित्र लावताना असा वाद झाला होता. पण ते लावताना केन्द्रात वाजपेयी सरकार सत्तेवर असल्यामुळे वादाकडे दुर्लक्ष करून अनावरण करण्यात […]
भाजपाला धक्का
भारतीय जनता पार्टीचे नेते काल केन्द्रीय अंदाजपत्रक सादर करण्याच्या मन:स्थितीत असताना आणि या मार्गाने मतदारांना कसे राजी करता येईल याचा विचार करीत असतानाच राजस्थानातल्या तीन पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत होते आणि राजस्थानातले मतदार पक्षाला जोरदार धक्का देत होते. कारण याच वेळी राज्यातल्या तीन पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत होते आणि त्या तिन्ही पोटनिवडणुकांत भाजपाचे उमेदवार पराभूत […]
आंध्रातली भाजपा सेनेच्या वळणावर
भारतीय जनता पार्टी कर्नाटकात येत्या काही महिन्यांत होणारी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसत असतानाच भाजपाचे नेते शेजारच्या आंध्र प्रदेशातली तेलुगु देसम पक्षाशी असलेली युती धोक्यात येईल अशी विधाने करायला लागले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत सहभागी असतानाही आपलाच सहभाग असलेल्या सरकारवर टीका करीत सुटली आहे तशी भाजपाही आंध्रात वर्तन करीत आहे. तिथे गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे […]
पंजाबातील अशुभ संकेत
पंजाबच्या लुधियाना शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रवीन्द्र गोसाई यांची काल झालेली हत्या हा मोठा अशुभ संकेत आहे कारण यातूनच पंजाबात पुन्हा एका दहशतवादी कारवाया वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. गोसाई यांना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी जवळून गोळया झाडल्या. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे गेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. […]
अय्यर यांचा घरचा अहेर
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भाषणे ठोकून मोठा पराक्रम केला आणि तिथे आपल्या पक्षातल्याच नाही तर देशातल्या घराणेशाहीची कबुली दिली. आपला देश सगळ्याच क्षेत्रात घराणेशाहीवर चालतो हे त्यांनी मान्य केले पण आपण ही घराणेशाही कधी मोडून काढणार आहोत हे काही त्यांनी सांगितले नाही. अर्थात तेवढा प्रामाणिकपणा त्याना दाखवता आला नाही. ही घराणेशाही केवळ […]
पोटनिवडणुकांत भाजपाची कसोटी
देशाला गुजरात आणि कर्नाटक विधानसभांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत आणि त्यांत कोण बाजी मारणार यावर लोकांच्या पैजा लागल्या आहेत. मात्र त्याआधी लोकसभेच्या आठ जागांवर पोटनिवडणुका होणार असून या पोटनिवडणुकांत भाजपाच्या लोकप्रियतेचा खरा कस लागणार आहे. या आठापैकी पंजाबातल्या एका जागेवर तर आताच निवडणूक होत आहे. चित्रपट अभिनेता विनोद खन्ना याच्या निधनाने मोकळ्या झालेल्या या जागेवर […]
आंदोलनाचा फज्जा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेन्द्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली काल रेल रोको आंदोलन झाले. या आंदोलनात कार्यकर्ते कमी आणि पोलीस जादा होते. शेवटी कार्यकर्ते कितीही कमी असले तरीही पोलिसांची कुमक ही आधीच ठरलेली असते आणि ती जास्त असली तरी हा नेहमीच आढळणारा प्रकार असतो. पण या आंदोलनाची एक खासियत होती की आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांपेक्षा त्याचे वार्तांकन […]
पंजाबातील अशुभ संकेत
पंजाबने १९८० च्या दशकात फार मोठा संघर्ष आणि हिंसाचार पाहिलेला आहे. अनुभवलेला आहे. त्यावेळी निर्माण झालेला संघर्ष नेमका काय होता हे एका वाक्यात सांगता येत नाही. पण कॉंग्रेस पक्षातले अंतर्गत मतभेद, त्याला मिळालेली शीख आणि हिंदू यांच्यातल्या द्वेषाची फोडणी, पाण्यावरून हरियाणाशी असलेला वाद, चोरटा व्यापार करणारांचे हितसंबंध, समृद्धीतून आलेला माज आणि दिशाहीन तरुणांची वाढती संख्या […]
राणे इधर ना उधर
नारायण राणे यांनी कॉंग्रेस तर सोडली आहे पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाजपाने त्यांंना प्रवेश दिलेला नाही. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते मुक्त झाले असले तरी भाजपाने जवळ न केल्याने आता राणे नेमके काय करीत आहेत हे समजत नाही. मात्र आजवर कॉंग्रेसमध्ये कुजलेले नारायण राणे आता कोठेही नसल्यामुळे कुजण्याची शक्यता दिसायला लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कॉंग्रेसच्या श्रेष्ठींनी शरद […]
तृणमूलला धक्का
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना हटवण्यासाठी देशात त्यांचे विरोधक एकत्र येण्याची तयारी करीत आहेत. प्रचाराच्या पातळीवर आणि काही माध्यमांच्या मार्फत तशा मोहिमा चालवल्या जात आहेत. आता मोदी यांचा प्रभाव ओसरत चालला असल्याचे चित्र तयार करण्याचा आणि तसा आरडा ओरडा करण्याचा प्रयास जारी आहे पण प्रत्यक्षात या विरोधकांना धक्के बसत आहेत आणि त्यांची प्रत्यक्षातली ताकद खच्ची होत […]
बेनझीरचा खुनी कोण ?
पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची २००६ साली झालेली हत्या कोणी केली याचा काही खुलासा झालेला नाही पण सध्या परागंदा असलेले माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना न्यायालयाने आरोपी ठरवले असून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा अशी शिफारस केली आहे. या खटल्यातील काही आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवून सोडून दिले असले तरी कुप्रसिद्ध अतिरेकी बैतुला मसुद याला […]
राणे यांची परवड
आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्याच राजकारणाचा बळी देण्याची परंपरा ही बर्याच शतकांपासून सुरू आहे. धृतराष्ट्रापासून ती सुरू झालेली आपल्याला दिसते. आपल्या मुलांना सत्ता मिळावी म्हणून धृतराष्ट्राने किती मोठे युद्ध लादले हे इतिहास सांगतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओवीत या धृतराष्ट्राचे वर्णनच मुळी, पुत्रस्नेहे मोहितु, असे केले आहे. या मांदियाळीत बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचीही गणना होते. […]
शिवसेना ठरतेय हास्यास्पद
महाराष्ट्रातल्या भाजपाच्या सरकारला शिवसेनेने पाठींबा दिला तेव्हापासून सेनेने कधीही युतीला आवश्यक अशी परिपक्वता दाखवलेली नाही. सातत्याने भाजपाला लक्ष्य करीत पण आपल्याच सरकारवर ताशेरे झाडायचे आणि मनातली मळमळ व्यक्त करीत रहायचे हाच शिवसेनेचा गेल्या तीन वर्षातला खाक्या राहिला आहे. अशा या वातावरणाला सेना नेते अधुन मधुन सरकारचा पाठींबा काढून घेण्याच्या वल्गनेची फोडणी द्यायलाही विसरत नाहीत पण […]
आणखी दोन समाजवादी पार्ट्या
भारतातले डावे विचारवंत म्हणवणारे कधीही एका आवाजात बोलत नाहीत. पूर्वीपासून त्यांना फुटीचा शाप लागलेला आहे. एकाच पक्षात राहून काम करायचे म्हटले की काही बाबतीत मतभेद होणे साहजिक आहे पण समाजवादी मंडळींची खोड अशी की किरकोळ मतभेदापायी ते पक्ष फोडायला मागेपुढे पाहणार नाहीत. म्हणून जनता पार्टीत आलेले समाजवादी आता किमान २० ते २५ पक्षात विखुरलेले आहेत. […]