श्रीनगर: जिल्हा विकास समितीच्या (डीडीसी) निवडणुकीसाठी जम्मू काश्मीरमध्ये दाखल झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा शिकारा दल सरोवरात उलटला. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन, अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक पत्रकार शिकाऱ्यातून प्रवास करीत होते. हे सर्वजण सुरक्षित आहेत.
भाजप नेत्यांचा शिकारा दल सरोवरात उलटला; नेते सुरक्षित
एका सभेसाठी हे नेते व पत्रकार आले होते. दल सरोवराच्या काठाजवळ आल्यावर शिकारा उलटला. त्यामुळे त्यामधील सर्वजण सुरक्षित राहिले. मात्र, पत्रकारांचे कॅमेरे आणि अन्य उपकरणे सरोवरात वाहून गेली.
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील डीडीसीच्या पोटनिवडणुका हा देशातील सर्वात मोठा निवडणूक कार्यक्रम आहे. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केल्याने त्यासाठी केंद्रीय पातळीवरील अनेक नेते निवडणूक मोहिमेसाठी जम्मू, काश्मीरमध्ये आले होते.