विधानसभा अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपकडून किसन कथोरे यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतल्याने नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होण्याची परंपरा आहे. The #MahaVikasAghadi candidate & Congress leader Nana Patole has been elected as Maharashtra Assembly […]
महाराष्ट्र
… तर तो गुन्हा पुन्हा पुन्हा करेन – उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात विरोधकांना फटकारले. छत्रपतींचे नाव घेणे हा गुन्हा असेल तर तो पुन्हा पुन्हा करायला मी तयार आहे. आपले दैवत, आईवडिलांना जो मानत नाही, त्याला जगण्याचा हक्क नाही. हा कारभार आपण ज्यांची शपथ घेऊन सुरू करत आहोत त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आम्ही घडवू, […]
ठाकरे सरकारने विश्वास ठराव १६९ विरुद्ध ० मतांनी जिंकला
मुंबई: राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने बहुमताच्या परीक्षेचा निर्णायक अडथळा आज यशस्वीरित्या पार केला. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच महाविकास आघाडी अस्तित्वात येण्याआधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर सत्तास्थापनेचा दावा महाविकास आघाडीने केला. त्यानंतर […]
चंद्रकांत पाटलांच्या आरोपाला नवाब मलिकांचे प्रत्युत्तर
मुंबई- विधानसभा अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान घेण्यात यावे अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी गुप्त मतदानाला का भिता, हिम्मत असेल तर गुप्त मतदान होऊ द्या, असे आव्हानही महाविकास आघाडीला दिले होते. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक म्हणाले की, नियमाला धरूनच खुले मतदान हे आहे. […]
काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले
मुंबई – काँग्रेसकडून नाना पटोले यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले असून ते लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. त्याचबरोबर कोणताही वाद उपमुख्यमंत्रीपदावरुन नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीलाच उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. दुसरीकडे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज भाजपकडून […]
गोव्यात परिवर्तन करायला निघालेल्या राऊतांना काँग्रेसचा दणका
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर आपला मोर्चा शिवसेनेने गोव्याकडे वळवला असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर आगामी काही दिवसात गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावाही केला होता. आपल्या संपर्कात गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री असून गोव्यात शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजप सरकार घालवणार असल्याचेही त्यांनी […]
चंद्रकांत पाटलांच्या मते महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर
मुंबई – गुरूवारी शिवतीर्थावर लाखो लोकांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच सहा आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पण या शपथविधी सोहळ्यावरही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशी असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर राज्यपालांकडे याविरोधात एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी […]
दिलीप वळसे-पाटील विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी राज्यपालांनी नियुक्ती केली होती. आता या पदावर दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हंगामी अध्यक्षपदासाठी नव्या सरकारने वळसे पाटील यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली […]
उद्धव ठाकरेंकडून आरेमधील कारशेडच्या कामाला स्थगिती
मुंबई – निवडणुकी दरम्यानच्या प्रचारावेळी सरकार आल्यावर आरेतील वृक्षतोडीसंदर्भात ठाम भूमिका घेईन, असे आश्वासन देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंचा मुंबईत विधीमंडळ वार्ताहर संघाकडून सन्मान करण्यात आला. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रातोरात झाडांची कत्तल करणे चुकीचे होते. विकासाला आमचा विरोध नाही, पण […]
‘वर्षा’वर स्थलांतरित होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई – गुरुवारी शिवतीर्थीवर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. आता ते लवकरच आपले वांद्रे येथील निवासस्थान मातोश्री वरुन मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षामध्ये स्थलांतरित होणार आहेत. पण यासाठी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. पण ते वर्षा बंगल्यावर निश्चितपणे जाणार असल्याचे सांगितले जाते. वर्षा निवासस्थानी एक कार्यालय आणि एक कॉन्फरन्स रुम असून ते […]
फडणवीसांच्या विदर्भातून निवडणूक लढवणार उद्धव ठाकरे ?
मुंबई : काल पद आणि गोपनियतेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर, त्यांनी आज मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. अद्याप विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे उद्धव ठाकरे हे सदस्य नाहीत. सहा महिन्यांच्या आत त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सभासद व्हावे लागेल. विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यामुळे आता दुसऱ्या आमदाराला राजीनामा द्यायला लावून पुन्हा विधानसभेची पोटनिवडणूक लढवणे हे तसे सोईचे […]
उद्धव ठाकरेंनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवरायांना वंदन करून मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी यावेळी मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर अलोट गर्दी पाहायला मिळाली. मंत्रालय नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याने सज्ज होते. मंत्रालयातील पोलिसांची सुरक्षाची नेहमीपेक्षा वाढवण्यात आली आहे. सहाव्या मजल्यावर जाऊन मुख्यमंत्री कार्यालयात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासोबत यावेळी आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. […]
उद्या होऊ शकते ठाकरे सरकारची बहुमत चाचणी
मुंबई : उद्याच उद्धव ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होऊ शकते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 6 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकार उद्याच बहुमत सिद्ध करण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये पुन्हा कुरघोडीचे राजकारण सुरू झाले असून दोन्ही […]
ही आहेत देशातील सर्वात भ्रष्ट राज्य
मुंबई : आपल्यापैकी अनेकांना भ्रष्टाचार मुक्त राज्य हवे असते. पण आपल्या देशात कोणतेही काम चिरीमिरी घेतल्याशिवाय होत नाही हे कट्टुसत्य आहे. ते नाकारता येणार नाही. त्यातच आता सुमारे 1 लाख 90 हजार लोकांचा प्रतिसाद मिळविणाऱ्या सर्वेक्षणानुसार आपण लाच घेतल्याचे 51 टक्के भारतीयांनी मान्य केले आहे. 51 टक्के लोकांनी वर्षभरात भ्रष्टाचार केला आहे. सर्वात जास्त लाच […]
राज्यपालांच्या पचनी पडला नाही शपथविधी दरम्यानचा नामोल्लेख
मुंबई : गुरुवारी शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या शपथविधी सोहळ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रोटोकॉलनुसार शपथविधी सोहळ्याची व्यवस्था नसल्याचा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला आहे. राज्यपालांनी शपथविधीदरम्यान मंचावरील अवस्थेवर नाराजी दर्शवली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्यामते, प्रोटोकॉलनुसार शपथविधी सोहळ्याची व्यवस्था नव्हती. प्रशासनाला शपथविधीची व्यवस्था करु दिली […]
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी दरम्यान ट्विटरवर #SorryBalaSaheb ट्रेंड
मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेतली. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. याच दरम्यान ट्विटरवर #SorryBalaSaheb हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीपूर्वी ट्रेंड होऊ लागले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या […]
फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना समन्स
नागपुर – स्थानिक न्यायलयाकडून २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती लपवल्याप्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावण्यात आले आहे. गुरूवारी फडणवीस यांच्या निवासस्थानी हे समन्स नागपूर पोलिसांनी पाठवले आहे. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असतानाच, दुसरीकडे हे समन्स माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहचले होते. १ नोव्हेंबर रोजी, याप्रकरणाबाबत […]
#CMO कार्यालयाला लागला फडणवीसांचा लळा
मुंबई – मोठ्या सत्तासंघर्षानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. काल शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शिवसेना आणि भाजपचे मुख्यमंत्री पदावरून बिनसले आणि युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्री पदी शिवसैनिक विराजमान झाला. त्यानंतर लगेच ‘सीएमओ महाराष्ट्र’ CMO Maharashtra ने आपल्या […]