ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धात २ सुवर्णसह चार पदकांची कमाई केलेल्या मनिका बात्रा हिच्या नावाची शिफारस क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठीत मानल्या जाणारया अर्जुन पुरस्कारासाठी केली गेली आहे. भारतीय टेबल टेनिस महासंघाने हि शिफारस केली असून संघाचे अधिकारी म्हणाले, गोल्डकोस्ट मध्ये मनिकाने ज्याप्रकारची कामगिरी बजावली आहे ती पाहता तिचे नाव या पुरस्कारासाठी नजरअंदाज […]
क्रीडा
क्रीडा
गेलकडून आयपीएलच्या मोसमातील पहिले शतक मुलीला समर्पित
मोहाली – किंग्ज इलेव्हन पंजाबने काल झालेल्या सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात १५ धावांनी विजय मिळवला. ख्रिस गेलच्या वादळी शतकाने या सामन्यात पंजाबच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. आपली मुलगी ख्रिसलियानाला तिच्या वाढदिवसाची गेलने खास भेट म्हणून हे शतक समर्पित केले आहे. आज तिचा दुसरा वाढदिवस असून गेल याबाबत म्हणाला, मला फक्त स्वत:ला सिद्ध करायच होते, माझ्या […]
पुण्यातील सामन्यासाठी सीएसके समर्थकांना खास मोफत रेल्वेची भेट
आयपीएल ११ मालिकेतील चेन्नई सुपरकिंग्सचा राजस्थान रॉयल बरोबर आज पुण्यात होत असलेला सामना टीमच्या समर्थकांना पहाता यावा म्हणून सीएसकेने या प्रेक्षकांना खास भेट दिली असून या भेटीमुळे या समर्थकांचे हृद्य आनंदाने उचंबळून आले आहे. या प्रेक्षकांसाठी टीमने पुण्यात येण्यासाठी चेन्नई रेल्वेस्थानकावरून गुरुवारी विलसपोडू नावाने खास रेल्वे रवाना केली असून यासाठी समर्थकांना तिकिटाचे पैसे मोजावे लागलेले […]
या पठ्ठ्याने बसल्या जागी घेतला कॅच, कमावले १ लाख रु.
आयपीएल ११ च्या सिझनमध्ये मुंबईत मंगळवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर यांच्यातील सामना मुंबईने ४६ धावांनी जिंकला. याच सामन्यात २० व्या ओव्हर मधील चौथ्या बॉलवर एका प्रेक्षकाने बसल्याजागी एका हाताने कॅच पकडून १ लाख रुपये बक्षीस मिळविले. अगदी मजेट या प्रेक्षकाने अंडरसनने टाकलेल्या फुलटॉस वर रोहित शर्माने डीप एक्स्ट्राकव्हर ला मारलेला सिक्सर पॅव्हेलीयन […]
तीन तास चौकशीनंतर पोलिसांची शमीला आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी
कोलकाता – कोलकाता पोलिसांकडून भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला काही काळासाठी दिलासा मिळाला असून शमीची तीन तास चौकशी केल्यानंतर आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्सच्या संघाकडून खेळण्यास पोलिसांनी परवानगी दिली. काही दिवसापूर्वी पत्नी हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसा आणि विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले होते. तसेच तिने पोलिसात शमी विरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर शमीला […]
माहिती अधिकाराच्या कक्षेत बीसीसीआयला आणा, कायदे मंत्रालयाला विधी आयोगाचा अहवाल
नवी दिल्ली – भारताच्या विधी आयोगाने जगातली सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना अशी ओळख असलेल्या बीसीसीआय व त्यांच्यांशी संलग्न असलेल्या सर्व स्थानिक क्रिकेट संघटनांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणण्याची शिफारस केली असल्यामुळे बीसीसीआयला आगामी काळात माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेखाली काम करावे लागण्याची शक्यता आहे. विधी आयोगाने यासंदर्भात कायदे मंत्रालयाला आपला अहवाल सादर केला असून विधी आयोगाने […]
एमसीएने पवनामधील पाणी आयपीएल सामन्यांसाठी वापरू नये – उच्च न्यायालय
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनला पुण्यातील स्टेडियममध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवरून मोठा दणका दिला असून एमसीएला पुढील आदेश येईपर्यंत पवना धरणातून पाणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयात आज एमसीएकडून करण्यात आलेला करार सादर करण्यात आला. पवनाचे पाणी एमसीए औद्योगिक वापरासाठी करणार असल्याचे या करारात म्हटले आहे. हा करार […]
… म्हणून विराटने नाकारली ऑरेंज कॅप
मुंबई – ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये प्रत्येक फलंदाज धडाकेबाज खेळ करत असतो. त्या फलंदाजाला ही कॅप दिली जाते ज्याने सीरिजमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या असतात. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला सध्या ही कॅप देण्यात आली होती. पण ती कॅप घेण्यास बंगळुरूच्या या कर्णधाराने स्पष्ट नकार दिला. बंगळुरू आणि मुंबईमध्ये मंगळवारी सामना खेळण्यात आला. विराटने या सामन्यात […]
विराट कोहली अशी कामगिरी करणारा जगात एकमेव खेळाडू
मुंबई – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला क्रिकेटमधील विक्रम मोडण्याची जणू सवयच लागली आहे. त्याने काल झालेल्या सामन्यात एक नवा विक्रम रचला आहे. आजपर्यंत जगातील एकाही फलंदाजाला एकाच संघासाठी ५००० धावा करण्याचा भीमपराक्रम जमलेला नाही. काल मुंबईविरुद्धच्या सामन्यात विराटने ४९ वी धाव घेताच या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने बेंगळुरूसाठी १५९ डावांत ५०४३ धावा […]
तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर कोहलीचा राग अनावर
मुंबई – रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूचा मुंबई इंडियन्सने ४६ धावांनी पराभव केला. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात आपला राग पंचांवर काढला. मैदानात फलंदाजीसाठी हार्दिक पांड्या आला असता बंगळुरूचा गोलंदाज ख्रिस वोक्स गोलंदाजी करत होता. वोक्सचा पहिला चेंडू पंड्याच्या बॅटजवळून गेला आणि तो यष्टीरक्षक क्विंटन डी’कॉकने कॅच केला. तेव्हा बंगळुरूच्या खेळाडूंनी हार्दिक झेलबाद झाल्याचे अपील केले […]
यष्टीरक्षक इशान किशन पंड्याच्या थ्रोवर जखमी
मुंबई – हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्या दरम्यान फेकलेला चेंडू यष्टीरक्षक इशान किशनला लागला आणि त्याच्या उजव्या डोळ्याखाली गंभीर दुखापत झाल्यानंतर सामना काही वेळासाठी थांबवावा लागला होता. हार्दिक पंड्याने तेराव्या षटकात फेकलेला चेंडू पकडताना यष्टीरक्षक इशान किशन गंभीर जखमी झाला. या चेंडूने जमिनीवर पडल्यावर अतिरिक्त उसळी घेतली आणि चेंडू इशानच्या […]
आश्चर्य करण्याजोगा ख्रिस गेलचा संघर्षमय प्रवास
वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला क्रिकेटमधील वादळ म्हणून ओळखले जाते. क्रिकेटच्या मैदानावर त्याची तुफान बॅटिंग वादळ निर्माण करते. तो ज्या आवेगाने प्रथम श्रेणी क्रिकेट असो की टी-२० क्रिकेटमध्ये खेळतो आणि त्याचे फटके क्रिकेट प्रेमींना एक पर्वणी असते. पण या ख्रिस गेलचा इतिहात पाहिला तर आश्चर्य करण्याजोगा आहे. त्याच्या आईला त्याला लहानाचा मोठे करताना काय […]
सुरेश रैनाने मैदानात न उतरताच नोंदवला ‘हा’ विक्रम
नवी दिल्ली – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब असा सामना रविवारी रंगला होता. पंजाबने या सामन्यात चेन्नईचा पराभव केला. पण दुखापतीमुळे या सामन्यात चेन्नईचा सुरेश रैना खेळू शकला नाही. पण मैदानात न उतरताच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा नावावर असणाऱ्या सुरेश रैनाने एक विक्रम आपल्या नावे केला. चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलच्या ११ वर्षाच्या इतिहासात […]
…अन् क्रिकेटच्या देवाने रस्त्यावर मांडला डाव; पहा व्हिडीओ
सर्वत्र सध्या आयपीएलची धूम सुरू असून त्यातच मुंबईमध्ये एक आगळावेगळा सामना पहायला मिळाला. हा सामना कुठल्याही स्टेडियममध्ये नव्हता, तर मुंबईतील रस्त्यावर होता. यात विशेष म्हणजे आजवर आपण ज्याला क्रिकेटच्या मैदानात षटकार मारताना पाहिले तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर चक्क रस्त्यावर फटकेबाजी करताना दिसला. सचिन वांद्र्यातील रस्त्यावर बॅटींग करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. क्रिकेटचा हा […]
गेलने सार्थ ठरवला सेहवागचा निर्णय !
चंदीगड: किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या चुरशीच्या सामन्यात ख्रिस गेलच्या वादळी खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या चार धावांनी विजय मिळवला. यंदाच्या मोसमातला ख्रिस गेलने आपला पहिलाच सामना खेळताना दमदार अर्धशतकी खेळी केली. ३३ चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांसह त्याने ६३ धावा फटकावल्या. किंग्स इलेव्हनला गेलच्या या खेळीमुळे २० षटकांत सात बाद १९७ अशी आव्हानात्मक धावसंख्या […]
पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीने ‘जे’ आठ हंगामात जमले नाही ‘ते’ करुन दाखवले
मोहाली – महेंद्रसिंह धोनीला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये झालेल्या सामन्यात सुर गवसल्याचे पाहायला मिळाले. पण त्याला संघाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही. चेन्नईचा पंजाबने ४ धावांनी पराभव केला. पण धोनीने या सामन्यात असे काही केले जे त्याला गेल्या आठ आयपीएल हंगामामध्येही जमले नाही. आपल्या मॅच फिनीशींग फलंदाजी आणि अचूक विकेटकिपींगसाठी चेन्नईचा […]
कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणाची शोएब अख्तरने केली निंदा
जम्मू काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणाची पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने निंदा केली असून अख्तरने याबाबतचे ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला या घटनेकडे पाहून खूप दु:ख होत असून यापूर्वी जैनीब आणि आता आसिफा. अत्याचार होणाऱ्या मुली हिंदू-मुस्लीम अथवा कोणत्याही धर्माच्या असो, त्या आपल्या मुली आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी, […]
गोल्डकोस्ट कॉमनवेथ गेम्स- भारताची ६६ पदकांची कमाई
ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे पार पडलेल्या २१ व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या शेवटच्या दैवाशी भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी बजावत ग्लासगो येथील ६४ पदकांचे रेकोर्ड मोडून ६६ पदकांची कमाई करण्याचा पराक्रम नोंदविला आहे. भारताने २६ सुवर्ण, २० रजत आणि २० कांस्य पदकांची कमाई केली आहे. २०२२ ला या स्पर्धा बर्मिघम येथे होणार आहेत. स्पर्धेच्या समाप्ती सोहळ्यात यंदा भारताची मुष्टियुद्ध […]