
29 जून… हीच ती तारीख आहे, जेव्हा टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला होता. हा तो दिवस आहे, जेव्हा भारतीय संघाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकावर कब्जा केला होता. या विजयानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक होत आहे. लोकांना त्याची विचारसरणी आणि संघाप्रतीचे समर्पण आवडले, पण आता अनेक चाहते रोहित शर्मावर प्रश्न उपस्थित करत आहेत आणि त्याचे कारण म्हणजे त्याचा प्रोफाईल फोटो आहे.
T20 वर्ल्ड कप जिंकला आणि आता लोक रोहित शर्माला का देत आहेत शिव्याशाप, भारतीय कर्णधाराने काय चूक केली?
खरंतर रोहित शर्माने सोमवारी सोशल मीडियावर त्याचा प्रोफाइल फोटो बदलला. फोटोमध्ये रोहित शर्मा बार्बाडोसच्या मैदानावर तिरंगा फडकवत होता. आता रोहितचा हा प्रोफाईल फोटो अनेक चाहत्यांना आवडला नाही, कारण जमिनीवर तिरंगा ध्वज दिसत होता.
flag code of India
Part – III ,section – IV, 3.20
“The flag shall not be allowed to touch the ground or the floor or trail in water”it comes under incorrect display
Please @ImRo45 don’t disrespect the Indian flag !
I tweeted this the same day we won , but deleted the tweet https://t.co/lrIKHRVGgw
— Reddit_user (@reddit_user_) July 8, 2024
हा तिरंग्याचा अपमान असल्याचे चाहत्यांनी ट्विट करून रोहित शर्माला सांगितले. एका चाहत्याने लिहिले की, ध्वज संहितेच्या नियमांनुसार तिरंगा ध्वज जमिनीवर लावू नये. तिरंग्याचा अपमान करू नका, असे आवाहन त्यांनी रोहित शर्माला केले. रोहितने हे काम भारतात केले असते, तर मोठा गदारोळ झाला असता, असे अनेकांनी सांगितले. बरं, येथे हे पाहणं महत्त्वाचं आहे की रोहित शर्माला हा नियम माहीत आहे का?
वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर रोहितने बार्बाडोसच्या मैदानात आपल्या देशाचा झेंडा रोवला होता. त्यावेळी भारतीय कर्णधार भावूक झाला होता आणि त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले यात शंका नाही. तिरंग्याचा अपमान करण्याचा रोहितचा हेतू कधीच नव्हता.
