VIDEO : अभिषेक शर्मा शून्यावर आऊट झाल्यावर खूश झाला होता युवराज सिंग, शतकानंतर बहीण कोमल शर्माने केला जबरदस्त डान्स


टीम इंडियाला T20 क्रिकेटचा नवा सुपरस्टार मिळाला आहे, हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अभिषेक शर्मा आहे, ज्याच्या बॅटने रविवारी हरारे मैदानावर शानदार शतक झळकावले. अभिषेक शर्माने झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या 47 चेंडूत 100 धावांची खेळी केली आणि टीम इंडियाने 100 धावांनी विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर अभिषेक शर्माने एक रंजक खुलासा केला आहे. बीसीसीआय टीव्हीशी बोलताना त्याने सांगितले की जेव्हा तो 0 वर बाद झाला, तेव्हा त्याचा गुरू युवराज सिंग खूप खुश होता.


अभिषेक शर्माने सांगितले की, पहिल्या सामन्यात 0 धावांवर बाद झाल्यानंतर त्याचे युवराज सिंगसोबत बोलणे झाले आणि तो खूप खूश होता. अभिषेक म्हणाला की युवी का आनंदी आहे, हे माहित नाही, पण ही चांगली सुरुवात असल्याचे त्याने सांगितले. मात्र, दुसऱ्याच सामन्यात अभिषेकने शतक झळकावले आणि त्यानंतर आता युवीला त्याचा अभिमान वाटला पाहिजे, असे या खेळाडूने म्हटले आहे.

टीम इंडियाच्या विजयानंतर अभिषेक शर्मानेही आपल्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉल केला. त्याचे आई-वडील आणि बहीण कोमल शर्मा फोनवर होते. भावाच्या शतकानंतर कोमल शर्मा इतकी खुश झाली की तिने नाचायला सुरुवात केली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


कोमल शर्मानेही तिच्या भावाच्या शतकाच्या अनेक इंस्टाग्राम स्टोरीज शेअर केल्या आहेत. आयपीएलदरम्यानही कोमल शर्मा आपल्या भावाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचायची. कोमल शर्मा ही व्यवसायाने डॉक्टर आहे. ती क्रीडा दुखापती तज्ञ आहे. त्याचबरोबर ती फिजिओथेरपिस्ट आहे.