
विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो यावेळच्या बकरी ईदनिमित्त बैलाचा बळी देणार आहे. आपल्या मुलासोबत यासाठी तो बैलाची खरेदी करण्यासाठी गेला होता. तेव्हाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. याबाबतचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. बकरी ईद 12 ऑगस्टला असून मोठ्या संख्येने बकरी आणि बैल यांची खरेदी कुर्बानीसाठी केली जाते. याची तयारी पाकिस्तानमध्ये आतापासूनच सुरू झाली आहे.
या बकरी ईदला ‘हा’ क्रिकेटपटू देणार बैलाची कुर्बानी
सर्फराज अहमद आणि त्याचा मुलगा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे. सर्फराज अहमद कुर्बानीसाठी बैल खरेदी करत असताना दिसत आहे. सर्फराजवर या व्हिडिओमुळे पुन्हा टीका करण्यात येत आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर तर चाहत्यांनी अत्यंत खालच्या पातळीत सर्फराजवर टीका केली होती.
विश्वचषक स्पर्धेत सर्फराज अहमदच्या नेत़ृत्वाखाली पाकिस्तान संघ खेळला होता. पण अपेक्षेनुसार कामगिरी या स्पर्धेत त्यांना न करता आल्यामुळे त्याचे नेतृत्व धोक्यात आहे. कसोटी संघाचे नेतृत्व त्याच्याकडून काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने 2017 मध्ये भारताला सर्फराज कर्णधार असतानाच पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
