गुपचूप बोहल्यावर चढली ड्रामा क्वीन


बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत काहीना काही कुरापती करुन नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी ती तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. राखीने नुकतीच आपण मुंबईतील जे डब्लू मॅरिएट हॉटेलमध्ये आपण गुपचूप लग्न केल्याची कबुली दिली आहे. राखी वयाच्या 40 व्या वर्षी रितेश नावाच्या एनआरआय तरुणासोबत बोहल्यावर चढली.

View this post on Instagram

Good morning sweetheart Fan’s

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on


राखी नववधूच्या पोशाखातील फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. हातात पंजाबी पद्धतीनुसार हातात भरल्या जाणाऱ्या बांगड्यावर रितेश असे लिहिलेले नाव खोडून तिने फोटो टाकले होते. पण ते ओळखण्याची हुशारी चाणाक्ष चाहत्यांनी दाखवली. सुरुवातीला, हे ब्रायडल फोटोशूट असल्याचा कांगावा करणाऱ्या राखीने आपण विवाहबंधनात अडकल्याचे अखरे मान्य केले. यूकेमध्ये आपला पती रितेश हा स्थायिक असल्याचे तिने सांगितले. आपणही व्हिसा मिळाल्यानंतर यूकेमध्ये जाणार असल्याचे राखी सांगते.


राखी सावंतच्या दाव्यानुसार तिची लव्ह स्टोरी तिच्याइतकीच फिल्मी आहे. माझी पहिली मुलाखत रितेशने टीव्हीवर पाहिली होती. तो इंटरव्ह्यू पाहूनच माझा चाहता झाला. त्याच्याबद्दल माहिती मिळताच मी ‘जिजस’कडे प्रार्थना केली, की मला त्याची पत्नी होण्याचे भाग्य मिळू दे. ती इच्छा तर पूर्ण झाली. माझ्यावर ईश्वराची कृपा असल्याचे राखीने सांगितले.


माझा फॅन रितेश झाल्यामुळे मला व्हॉट्सअॅप मेसेज करायचा. आमच्या गप्पा वाढल्या आणि लवकरच आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो. या गोष्टीला वर्ष झाले असेल. माझ्या एका मित्राशी लग्न करशील का? असा प्रश्न मला रितेशने विचारला. पण मी नकार दिल्याचे राखी म्हणाली.

View this post on Instagram

bridel shooting

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on


त्याला मी म्हणाले, की माझ्या हृदयातील घंटी तुझ्या मित्राला बघून वाजत नाही. तो त्यावर लगेच म्हणाला, मग माझ्यासाठी वाजते का? मी त्याच्याकडे विचार करण्यासाठी वेळ मागितला. वेळ गेला, तसे मला जाणीव झाली, की रितेशच्या प्रेमात मी पडले आहे. ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे राखीने सांगितले.

View this post on Instagram

Good morning sweetheart fans morning

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on


आमची भेट लग्नाच्या केवळ 15 दिवस आधी झाली. योग्य व्यक्तीची निवड मी केल्याची खात्री त्याची भेट झाल्यावर मला पटली, असेही राखी म्हणते. खाजगी आयुष्य जगजाहीर करण्याची रितेशला आवड नाही. मीडियासमोर येण्याची त्याला इच्छा नाही. तो एक बिजनसमॅन असल्याची माहिती राखीने दिली.

Leave a Comment