
मुंबई – गंभीर आर्थिक फसवणूक चौकशी विभागाने (एसएफआयओ) पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या गीतांजली जेम्सला कर्ज दिल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोच्चर आणि अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ शिखा शर्मा यांना समन्स बजावले असून पीएनबीच्या बनावट एलओयूना प्रतिसाद देत गीतांजली जेम्सला पाच हजार २०० कोटी रुपये कसे दिले याची माहिती चंदा कोच्चर व शिखा शर्मा यांनी स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधीने आज एसएफआयओसमोर हजर राहून द्यावी, असे समन्समध्ये म्हटले आहे.
पीएनबी घोटाळाप्रकरणी चंदा कोच्चर आणि शिखा शर्मा यांना समन्स
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी पंजाब नॅशनल बँकेच्या साडेअकरा हजार कोटींच्या घोटाळ्यात आरोपी असून मेहुल चोक्सीच्या कंपनीला पाच हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज देणाऱ्यांमध्ये या बँकांचाही समावेश होता. हे समन्स तपासाबाबत या बँकांकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बजावण्यात आले आहे. कोच्चर व शिखा शर्मा यांनी स्वत: किंवा त्यांच्या प्रतिनिधीने एसएफआयओच्या कार्यालयात हजर राहावे, असे समन्समध्ये म्हटले आहे.
