जनधन योजना बाळसे धरू लागली


पंतप्रधान मोदी यांनी देशातील श्रीमंत गरीब सर्व लोकांची बँकखाती असावीत, त्यातही गरीब लोकांना बँक लाभ मिळावा म्हणून सुरु केलेली जनधन योजना आता खऱ्या अर्थाने बाळसे धरू लागल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारी २०१८ अखेर या खात्यातून ७५ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. नोटबंदी जाहीर झाल्यानंतर अनेकानी या खात्यांचा वापर काळा पैसा पांढरा करून घेण्यासाठी केला होता. त्यावेळी म्हणजे नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी झाल्यावर जानेवारी २०१७ मध्ये जनधन खात्यात ८७ हजार कोटी जमा झाले होते त्यानंतर आता प्रथमच फेब्रुवारी २०१८ पर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी आल्या आहेत. याचा अर्थ हि योजना आता खऱ्या अर्थाने लोकप्रिय बनली आहे असा काढला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या खात्यातून ३१ कोटी खातेदारांनी पैसे जमा केले आहेत. त्यात १८ कोटी शहरी तर १३ कोटी खातेदार ग्रामीण भागातील आहेत. विशेष म्हणजे यात ५० टक्क्याहून अधिक म्हणजे १८ कोटी महिला खातेदार आहेत. अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार युपी, प.बंगाल, बिहार येथील खादेदारांची संख्या अधिक प्रमाणात आहे. युपी मध्ये १२४४३, प.बंगाल ११७६०, बिहार ६९८३ खातेदार आहेत.

या खातेदारांना ३० हजार रुपयांचे जीवनविमा कव्हर तसेच २ लाख रुपयांची अपघात कव्हर दिले जात आहे.

Leave a Comment