ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आयडियाचा जबरदस्त प्लॅन


नवी दिल्ली : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना टिकवून ठेवण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनव्या ऑफर्स सादर करतात. सर्वात आधी फुटबॉल ऑफर जिओने सादर केली होती. एअरटेल आणि आयडियाने देखील यानंतर युजर्ससाठी कॅशबॅक ऑफर सादर केली आहे.

आयडियाने देखील सर्व नव्या ४जी हॅडसेटवर मेगा कॅशबॅक ऑफर सादर केली आहे. जिओच्या फुटबॉल ऑफरला ही ऑफर नक्कीच टक्कर देईल. आयडियाने या ऑफरसाठी अनेक स्मार्टफोन कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. कंपनीची ही ऑफर प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. ही ऑफर २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे आणि ३० एप्रिलपर्यंत सुरू राहील. ऑफरच्या काळात खरेदी केलेल्या ४जी स्मार्टफोनवर आयडियाकडून २०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

युजर्सना कॅशबॅक मिळवण्यासाठी प्रत्येक महिन्याला १९९ रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचा रिचार्ज करावा लागेल. यानंतर युजर्सना कॅशबॅक मिळेल. १९९ रुपयांव्यतिरिक्त ३९८, ४४९ आणि ५०९ रुपयांचे रिचार्ज करु शकतात. २००० रुपयांचे कॅशबॅक युजर्संना टप्प्या-टप्प्यात मिळेल. म्हणजे पहिले १८ महिने कमीत कमी ३००० रुपयांचे रिचार्ज केल्यावर युजर्संना ७५० रुपयांचे कॅशबॅक मिळेल.बाकीच्या १२५० रुपयांचा कॅशबॅक मिळण्यासाठी युजर्संना १८ महिन्यात कमीत कमी ३००० रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.आयडियाच्या पोस्टपेड युजर्सला कॅशबॅकचा फायदा घेण्यासाठी ३८९ रुपयांचे रिचार्ज करायला हवे.

Leave a Comment