चंद्रकांत दादा आपले जेवढे वय आहे, तेवढी शरद पवारांची संसदीय कारकीर्द आहे; रुपाली चाकणकर यांची टीका


पुणे – मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेले भाष्य मतीगुंग करणारे आहे. खोटे बोला पण रेटून बोला, अशी शरद पवार यांची प्रवृत्ती असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापुरात बोलतांना केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे. चंद्रकांत दादा आपले जेवढे वय आहे, तेवढी शरद पवार यांची संसदीय कारकीर्द असल्याचा टोला चाकणकर यांनी लगावला.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडली आहे. हे संपुर्ण महाराष्ट्र गेल्या दिड वर्षापासून पाहत आहे. या नियुक्त्या का रखडल्या आहेत? यामध्ये राज्य सरकार आपल्या अधिकारानुसार काही नाव राज्यपांलाकडे देते. राष्ट्रीय शिष्टाचारानुसार राज्यपाल ती नाव मान्य करतात. पण राज्यात आपली सत्ता नसल्यामुळे केंद्र सरकार राज्यपालांना हाताशी धरुन अडवणूक करत असल्यामुळे त्यामुळे राज्याचे हित लक्षात घेता शरद पवार यांनी आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवर बोलताना कदाचित राज्यपालांना वयोमानानुसार लक्षात राहत नसल्याचे वक्तव्य केले.


पण, चंद्रकांत पाटील यांनी यावर बोलतांना राज्यपालांच्या बाजूने बोलत आणि त्यांच्या मदतीला धावून जात, शरद पवार यांच्यावर टीका केली. राज्यपाल हे की भाजपचे पदाधिकारी नाहीत. चंद्रकांत पाटील आपले जितक वय आहे, तितकी शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आहे. हे आपण लक्षात घ्यावे. ४ दिवस दिल्लीत थांबूनही तुम्हाला अमित शहा यांनी भेट नाकारली, याबाबत तुम्ही आत्मचिंतन करावे, असा टोला चाकणकर यांनी लगावला.