पुणेकर कार्यकर्त्याने एवढे खर्च करुन उभारले नरेंद्र मोदींचे मंदिर


पुण्यातील औंध येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक छोटे मंदिर उभारण्यात आले आहे. हे मंदिर भाजप कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी उभारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे मंदिर पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.

अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत आहेत. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आला आहे. या मंदिरात मोदींची दोन फुटी उंच मूर्ती बसवण्यात आली आहे.

मोदींची ही मूर्ती खास जयपूर येथून तयार करून आणली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागल्याचे मयुर मुंडे सांगतात. अनेकजण या मंदिरासमोर आवर्जून फोटो काढून घेतानाही दिसत आहेत. काहींना तर सेल्फीचा मोहही आवरत नाही.

पुणेकर नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे मंदिर पाहण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंडे यांना मोदींचे हे मंदिर उभारण्यासाठी एका फाऊंडेशनने अर्थसहाय्य करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे मंदिर ‘नमो फाऊंडेशन’च्या माध्यमातून उभारण्यात आले आहे.

दीड लाख रुपये हे मंदिर उभारण्यासाठी खर्च करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी लोकार्पण करण्यात आल्यापासून येथे अनेकजण हे मंदिर पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.