अविनाश जाधव यांच्याकडून प्रशासनाची पोलखोल; सादर केला पुरावा


मुंबई: पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना बजावण्यात आली असून अविनाश जाधव गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. मनसेकडून शुक्रवारी ठाणे महापालिकेसमोर कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी आंदोलन सुरु होते. पोलिसांनी त्यांना हे आंदोलन करत असताना ताब्यात घेतल्यानंतर अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडीत राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय हे मी सातत्याने सांगतोय.

मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय हे मी सातत्याने सांगतोय.. त्याचे मी काही पुरावे ही देतोय मी नर्सेस साठी केलेल्या आंदोलनात माझ्यावर केलेले गुन्हे हे खोटे आहेत, ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेल, सत्ताधारी माझ्या विरोधात मोठं षडयंत्र रचत आहेत..मला आपल्या सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे.आपला,अविनाश जाधवठाणे- पालघर जिल्हाध्यक्षमहाराष्ट्र नवनिर्माण सेना

Posted by Avinash Jadhav MNS on Sunday, August 2, 2020

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अविनाथ जाधव यांना अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान ठाणे महानगपालिकेने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचा दावा अविनाश जाधव यांनी केला आहे. पोलिसांत महापालिकेने दाखल केलेल्या तक्रारीत महापालिकेच्या गेटजवळ असलेल्या सुरक्षारक्षकांना अविनाश जाधव यांनी शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. पण अविनाश जाधव यांनी सादर केलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये त्यांची गाडी गेटजवळ थांबलीच नसल्याचे दिसून येत असल्यामुळे गाडी गेटजवळ थांबलीच नाही, मग कोणाला मी शिव्या दिल्या, असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

फेसबुकद्वारे अविनाश जाधव म्हणाले की, मी त्याचे काही पुरावे ही देतो. नर्सेससाठी केलेल्या आंदोलनात माझ्यावर केलेले गुन्हे हे खोटे असून ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेल, माझ्या विरोधात सत्ताधारी मोठे षडयंत्र रचत आहेत. मला आपल्या सगळ्यांचा पाठिंबा हवा असल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.