भारतासोबत मिळून कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत आहे अमेरिका : डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंगटन : भारतात आणि अमेरिकेत महान वैज्ञानिक आणि संशोधक असल्याचे म्हणत भारत आणि अमेरिका एकत्र येऊन कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले आङे. पत्रकारांसोबत संवाद साधताना ट्रम्प यांनी सांगितले की, या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना प्रतिबंधक प्रभावी लस विकसित होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच मी भारताचा दौरा केला असून अमेरिका भारतासोबत एकत्र येऊन काम करत आहे. मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये भारतीय असून त्यांच्यातील अनेक लोक लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत असून ते उत्तम वैज्ञानिक आणि संशोधक आहेत.


त्याचबरोबर यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आपले चांगले मित्र असल्याचा आवर्जुन उल्लेख केला. वृत्तसंस्था एपीने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी बोलताना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा त्याच्या काही दिवसांनी कोरोना व्हायरसवर परिणामकारक लस बाजारात उपलब्ध होऊ शकते, असे म्हटले आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्याकडून प्रशासनात नियुक्त करण्यात आलेल्या एक माजी औषध कार्यकारी मोनसेप स्लोई यांनी बोलताना सांगितले की, या वर्षाच्या अखेरपर्यंत लस उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी रोज गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, त्यांना अमेरिकेतील आर्थिक व्यवहार पुन्हा सुरु होण्यासोबतच अर्थचक्र सुरळीत होताना पाहायचे आहे.


दरम्यान, भारताला व्हेंटिलेटर दान करणार असल्याचेही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अमेरिका सांगितले आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून ते म्हणाले की, ही घोषणा करताना मला गर्व होत आहे की, संयुक्त राष्ट्र अमेरिका भारताला व्हेंटिलेटर दान करणार आहे. या महामारी दरम्यान, आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. आम्ही लस तयार करण्यासाठीही मदत करत आहोत. आम्ही मिळून अदृश्य शत्रूला हरवणार आहोत. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी भारताला अतिरिक्त तीन दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ट्रम्प प्रशासनाने याआधी USAID च्या माध्यमातून भारताला 5.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मदत करण्याची घोषणा केली होती.

Leave a Comment