एका क्लिकवर जाणून घ्या आजपासून लॉकडाऊनमध्ये कोणाला सूट मिळणार याची संपूर्ण यादी


नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊन जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे 3 मेपर्यंत वाढवण्यात आला असून त्यातच आज म्हणजेच 20 एप्रिलपासून देशांतील काही भागांत लॉकडाऊन अंशतः शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊनचे सर्व नियम कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणी लागू असणार आहे. फक्त ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादूर्भाव पाहायला मिळत नाही अशाच ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार आहेत. आजपासून हॉटस्पॉट नसणाऱ्या ठिकाणी लॉकडाऊनच्या गाइडलाइन्समधून केंद्र सरकारकडून सूट देण्यात येणार आहे. आजपासून लॉकडाऊनमधून कोणत्या गोष्टींना सूट मिळणार आहे, याची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.

शेतकऱ्यांना देशातील लॉकडाऊनपासून सूट देण्यात आली असून शेती संबंधित प्रत्येक कामात सूट देण्यात आली आहे. तसेच फक्त आवश्यक सामानांचीच होम डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली आहे. याआधी फक्त अत्यावश्यक सेवांनाच लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली होती. परंतु, आता लघुउद्योग, लहान व्यवसायांशी जोडलेल्या व्यक्ती, छोटी दुकाने यांनाही लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे.

Leave a Comment