कोरोना : उपचाराच्या क्लेमवर तात्काळ निर्णय घेणार विमा कंपन्या

विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार लक्षात घेऊन विमा कंपन्यांना आणि क्लेम संबंधीत प्रकरणांसाठी आवश्यक दिशानिर्देश जारी केले आहेत. या अंतर्गत विमा कंपन्यांना कोरोनाच्या उपचारासंबंधी दाव्याच्या अर्जावर दोन तासांच्या आत निर्णय घ्यावा लागणार आहे. जेणेकरून पीडित रुग्णाला समस्येचा सामना करावा लागणारन नाही.

इरडाने सर्व विमा कंपन्यांना आदेश दिले आहेत की कोरोना व्हायरस महामारीमध्ये कॅशलेस उपचार आणि हॉस्पिटलमध्ये डिस्चार्जच्या अर्जावर दोन तासात निर्णय घेणे आवश्यक आहे.

इरडानुसार, हॉस्पिटलकडून अंतिम बिल अथवा डिस्चार्जची सूचना मिळताच कंपन्यांना दोन तासांच्या आत आपला निर्णय रुग्ण आणि हॉस्पिटलला सांगावा लागेल. थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्ससाठी आवश्यक दिशानिर्देश जारी करण्यात आलेले आहेत.

मार्चमध्ये देखील इरडाने कंपन्यांना कोरोना रुग्णांचे दावे त्वरित आणि प्राथमिकता देऊन निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. या दाव्यांचा निर्णय घेण्यासाठी 24 तास सक्रिय असणारी प्रणाली तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अर्थ मंत्रालयाने लॉकडाऊनमुळे आरोग्य आणि वाहन विम्याच्या नुतनीकरणचा कालावधी वाढवून 15 मे पर्यंतची मुदत दिली आहे.

आरोग्य विमा देणाऱ्या सर्व कंपन्यांना कोरोनासंबंधी कव्हर देण्याचे देखील आदेश इरडाने दिले आहेत. कोरोना उपचाराचा सर्व कव्हर देणे सध्याच्या विमा नियमांनुसार करणे गरजेचे आहे.

Leave a Comment