ह्युंडाईची नवी BS-6 व्हर्ना लाँच

ह्युंडाईने मागील महिन्यात आपली लोकप्रिय सेडान व्हर्नाचे बीएस6 मॉडेल लाँच केले आहे. या कारची किंमत 9.31 लाख रुपये असून, यामध्ये वायरलसे चार्जिंगसह 8 असे फीचर देण्यात आले आहेत, जे पहिल्यांदाच या सेगमेंटच्या कारमध्ये मिळत आहेत.

नवीन व्हर्नामध्ये 1.5 लीटर पेट्रोल, 1.5 लीटर डिझेल आणि 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय मिळत आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार ही कार 25 किमी प्रती लीटर मायलेज देईल.

अपडेटेड व्हर्नामध्ये 1.5 पेट्रोल इंजिन आहे. जे 115 हॉर्स पॉवर्स आणि 144 एनएम टॉर्क जनरेट करते. याचे 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स व्हर्जन 17.7kmpl मायलेज देते. तर ऑटोमॅटिक गिरअबॉक्स व्हर्जन 18.48 kmpl मायलेज देते.

Image Credited – ZigWheels

नवीन व्हर्नाचे 1.0 लीटर टर्बो पेट्रोल व्हर्जन 19.2kmpl मायलेज देते. हे इंजिन 119 हॉर्स पॉवर आणि 172 एनएम टॉर्क निर्माण करते. या इंजिन 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्ससोबत येते.

डिझेल इंजिनबद्दल सांगायचे तर 115 हॉर्स पॉवर आणि 250 एनएम टॉर्क निर्माण करणारे 1.5 डिझेल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत येते. हे इंजिन 25kmpl मायलेज देते. तर ऑटोमॅटिक व्हर्जन 21.3kmpl मायलेज देते.

Image Credited – drivespark

या सेगमेंटमध्ये काही फीचर पहिल्यांदाच कारमध्ये मिळणार आहेत. व्हर्नामध्ये ब्लू लिंक टॅलीमॅटिक कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्यात 45 फीचर्स आहेत. याद्वारे वॉइस कमांड फॉर इन-कार फंक्शन, रिमोट इंजिन आणि एअर कॉन ऑपरेसन फीचर्स मिळतील. हे फीचर्स स्मार्टवॉचद्वारे देखील कंट्रोल करता येतील.

या व्यतिरिक्त डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह 4.2 इंच मल्टी इंफॉर्मेशन डिस्फ्ले मिळेल. वायरलेस चार्जर, रिअर यूएसबी चार्जिंग पॉइंट, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, हँड्स फ्री बूट ओपनिंग, इमर्जेंसी स्टॉप सिग्नल आणि आर्केमीज ऑडिओ सिस्टम सारखे फीचर्स या कारमध्ये मिळतील.

ही कार 11 वेगवेगळ्या मॉडेलमध्ये उपलब्ध असून, सुरूवातीच्या व्हेरिएंटची किंमत 9.31 लाखांपासून सुरू आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 15.10 लाख रुपये आहे.

Leave a Comment