…अन् बायकोसोबत हॉस्पीटमध्ये दाखल झाला अक्षय


सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याने केलेल्या एका सामाजिक कार्यामुळे खूप चर्चेत आहे. अक्षय कुमारचे कोरोनाग्रस्तांसाठी 25 कोटी रुपये दान केल्यानं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. पण अक्षय कुमार त्याची पत्नी ट्विंटकल खन्नासोबत या कोरोना व्हायरस दरम्यान हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.


अक्षयची पत्नी ट्विंकलने स्वतःच तिच्या इन्स्टाग्रामवर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात स्वतःच ड्रायव्हिंग करुन अक्षय तिला हॉस्पिटलमधून घेऊन जाताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ट्विंकल आणि अक्षय हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याने ट्विंकलला कोरोना व्हायरसची लागण झाली का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण याचे उत्तर स्वतः ट्विंकलने या व्हिडीओमध्ये दिले आहे.

Leave a Comment