उद्धव ठाकरेंचा खुलासा; राजदेखील मला दिलासा आणि वेळोवेळी सूचनाही देत आहे


मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्यातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिला त्याचबरोबर आभारही व्यक्त केले आहेत. आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्व सूचनांचे आपण पालन करत आहात. माझ्यासोबत तुम्ही सर्वजण आहात. माझ्यासोबत विरोधी पक्षही आहे. तसेच राजही मला फोन करून दिलासा आणि सूचना देत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

आता आपली टीम चांगली तयार झाली आहे. सर्व देशातील आणि राज्यातील कामगार त्यांच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी जिथे आहात तिथेच थांबा. या सर्वांना जेवणाची आणि राहण्याची आपण व्यवस्था करत आहोत. यासाठी राज्यात 163 ठिकाणी केंद्र सुरू करत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

24 तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याची निर्णय घेतला आहे. तरी देखील काही लोक बाहेर पडत असल्यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, विनाकारण बाहेर येऊ नका घरातच राहा. पंतप्रधान मोदी माझ्याशी बोलत आहेत. अमित शहा आणि जावडेकरदेखील माझ्याशी संपर्कात असल्याचा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Leave a Comment