नोकरदारांना दिलासा ! सध्याच्या परिस्थितीत पीएफ खात्यातून काढू शकता एवढी रक्कम


नवी दिल्ली : कोरोनाग्रस्तांची संख्या देशभरात सध्याच्या घडीला वाढत आहे. परिणामी येत्या काही दिवसातमध्ये कोरोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर कोरोनाचे संकट पुढचे काही दिवस रोखून धरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन देशभरामध्ये जाहिर केला आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून कोरोनाशी लढा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. अशावेळी कामगार मंत्रालयाकडून ईपीएफओसाठी विशेष परवानगी दिली आहे.


यानुसार ईपीएफओचे 6 कोटी सभासद त्यांच्या खात्यामधून 3 महिन्यांएवढा पगार आणि महागाई भत्ता काढून घेऊ शकतात. मंत्रालयाकडून 28 मार्चला Employee Provident Fund 1952 मध्ये केलेल्या सुधारणेबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. देशभरातील कोरोनाचे वाढणारे संकट लक्षात घेता, ईपीएफओ सदस्य त्यांच्या पीएफ खात्यातून 3 महिन्याचा मूळ पगार आणि महागाई भत्त्याएवढी रक्कम किंवा तुमच्या खात्यामध्ये असणाऱ्या रकमेच्या 75 टक्के रक्कम काढू शकतात. हा नवीन नियम 28 मार्चपासून लागू करण्यात आला आहे. या नोटिफिकेशननंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांना नोटीस पाठवली आहे. रक्कम काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी क्लेम केल्यास त्याला मान्यता देण्याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

Leave a Comment