
मुंबई – छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी राजीनामा दिला आहे. मेटे यांनी हा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी सत्तेत आलेल्या सरकारला वेळ नाही. यासाठी ३ पत्रे मी सरकारकडे पाठवली, पण त्यालाही सकारात्मक उत्तर न दिल्यामुळे मी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे मेटेंनी सांगितले.
शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा विनायक मेटेंनी दिला राजीनामा
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ३ वर्षांपूर्वी अरबी समुद्रात उद्घाटन झाले होते. पण, हे स्मारक अद्याप उभे राहू शकले नाही. त्यातच सरकार बदलले असल्याने या स्मारकाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. सरकार याकडे लक्ष देत नसल्याचे मेटे म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
