महागड्य़ा देशांच्या यादीत भारत या स्थानावर

अमेरिकेतील बिझनेस मॅग्झिन सीईओ वर्ल्डने जगातील 132 देशांचे सर्वेक्षण करून सर्वात महागड्या देशांची यादी जाहीर केली आहे. यानुसार, यूरोपातील देश स्विर्झलँड जगातील सर्वात महागड्या देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे. या देशाची लोकसंख्या 86 लाख आहे.

दुसऱ्या क्रमांकावर 53.6 लाख लोकसंख्येचा देश नॉर्वे आणि तिसऱ्या स्थानावर 3.63 लाख लोकसंख्या असलेला आइसलँड हा देश आहे. या यादीत सर्वात शेवटचा क्रमांक पाकिस्तान (132), अफगाणिस्तान(131) आणि भारता(130)चा आहे. थोडक्यात, जगातील सर्वात स्वस्त देशांमध्ये पाकिस्तान पहिल्या, अफगाणिस्तान दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

सर्वेक्षणासाठी मॅग्झिनने तीन मानके निश्चित केली. यात या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घराचे भाडे, किराण्याचे सामान आणि हॉटेलमधील जेवणाच्या किंमती याचा समावेश होता. तज्ञांनी कपडे, टॅक्सीचे भाडे, इंटरनेटच्या किंमती या गोष्टींचा देखील सर्वेक्षणामध्ये समावेश केला होता. यामध्ये स्विर्झलँडला सर्वाधिक 122 गुण मिळाले. तर पाकिस्तानला 21.98 आणि भारताला 24.58 गुण मिळाले.

सर्वात महागड्या देशांच्या यादीत फ्रान्स 14, ऑस्ट्रेलिया 16, अमेरिका 20, ब्रिटन 27, इटली 28, जर्मनी 29, चीन 80 आणि रशिया 82 व्या क्रमांकावर आहे.

हे सर्वेक्षण 132 देशांच्या राजधानीमध्ये करण्यात आले. या मागचा उद्देश जगात वेगाने वाढणाऱ्या बिझनेस इंडेक्सची माहिती घेणे हा होता.

जगातील सर्वात स्वस्त टॉप – 10 देश –

  1. पाकिस्तान
  2. अफगाणिस्तान
  3. भारत
  4. सीरिया
  5. उज्बेकिस्तान
  6. किर्गिस्तान
  7. ट्यूनिशिया
  8. व्हेनेझुएला
  9. कोसोवो
  10. जॉर्जिया

 जगातील सर्वात महागडे टॉप – 10 देश –

  1. स्विर्झलँड
  2. नॉर्वे
  3. आइसलँड
  4. जापान
  5. डेनमार्क
  6. बहामास
  7. लग्झमबर्ग
  8. इस्त्रायल
  9. सिंगापूर
  10. दक्षिण कोरिया

 

Leave a Comment