चीनमधील एका गर्भवती महिलेच्या पतीचे कृत्य लाखो लोकांच्या मनाला स्पर्शुन गेले आहे. डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला बसण्यासाठी खुर्ची न मिळाल्याने पती महिलेला बसण्यासाठी स्वतःच्या शरीराची खुर्ची करतो.
… म्हणून गर्भवती पत्नीला बसण्यासाठी पतीने स्वतःच्या शरीराची केली खुर्ची
सोशल मीडियावर सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गर्भवती महिला डॉक्टरांकडे तपासणीसाठी आली आहे. मात्र तिला बसण्यासाठी तेथे खुर्चीच नसते. तिचे पाय दुखःत असल्याने ती काहीशी अस्वस्थ दिसत आहे. अशावेळी या महिलेचा पती स्वतः जमिनीवर बसतो व महिलेला त्याच्या पाठीवर बसण्यास सांगतो.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हे सर्व घडत असताना देखील एकही व्यक्ती महिलेला बसण्यासाठी जागा देत नाही. सर्वजण मोबाईलमध्ये व्यस्त आहेत.
चीनमधील हेगांग पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. युजर्स या पतीच्या कृत्याचे भरभरून कौतूक करत आहेत. मात्र काहींनी म्हटले की, जर महिला काही पावले चालली असती, तर तिला थोड्याच अंतरावर समोर रिकाम्या खुर्च्या बसायला मिळाल्या असत्या. मात्र एका युजर्सने यावर म्हटले की, डॉक्टरांनी बोलवल्यावर त्यांना आवाज आला नसता, म्हणून ते तेथे बसले.
