जगातील सर्वात रहस्यमयी जीव, जो कधीच मरत नाही

असे म्हटले जाते की, पृथ्वीवर जेवढे जीव-जंतू अथवा सजीव आहेत, त्यांचे वय निश्चित आहे. म्हणजेच जे काही सजीव आहे, ते ठरावीक काळानंतर नष्ट होणार. मात्र पृथ्वीवर असा एक जीव आहे, जो कधीच मरत नाही.

हा जीव म्हणजे जेलीफिश. जेलीफिश एक प्रकारचा मासा आहे. जगभरात याच्या 1500 पेक्षा अधिक प्रजाती आहे. दिसायला जेलीफिश पारदर्शी असतो. मात्र मनुष्यासाठी खूपच धोकादायक आहे. आपल्या डंखने एखाद्या व्यक्तीचा जेलीफिश सहज जीव घेवू शकतो.

(Source)

खोल समुद्रात जेथे प्रकाश पोहचत नाही, अशा ठिकाणी जेलीफिश आढळतात. त्यामुळे मनुष्याला त्यांच्यापासून धोका नसतो. सांगण्यात येते की, जेलीफिशचे पृथ्वीवरील अस्तित्व हजारो वर्षांपासून आहे.

जेलीफिश जगातील एकमेव असा मासा आहे, ज्याचा 95 टक्के भाग पाण्याचा आहे. याच कारणामुळे हा मासा पारदर्शी आहे. असे म्हटले जाते की, जेलीफिशला मेंदू नसतो, त्याचमुळे त्यांच्या आजुबाजूला छोट्यामोठ्या माशांचे अस्तित्व असते. कारण त्यांना सुरक्षित वाटत असते.

(Source)

जेलीफिशची लांबी सरासरी सहा फूट आणि वजन 200 किलोपर्यंत असते. आतापर्यंतची सर्वात मोठी जेलीफिश अमेरिकेत सापडली होती. याची लांबी 7.6 फूट होती तर शेपूट 120 फूट लांब होते.

(Source)

जेलीफिश कधीच न मरणारा जीव आहे. कारण त्यांच्यामध्ये असे वैशिष्ट्य आहे की, त्यांना दोन भागात कापले तरी त्यांचा मृत्यू होत नाही. उलट त्या दोन्ही भागांपासून वेगवेगळी जेलीफिश तयार होतात.

Leave a Comment