अहवाल : चेहऱ्याला ‘कुरूप’ बनवत आहे स्मार्टफोन

याच वर्षी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) रिपोर्टमध्ये समोर आले होते की, स्मार्टफोनमुळे लहान मुलांचे दात तुटत आहेत. या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, 9 ते 10 लहान मुले हॉस्पिटलमध्ये भर्ती झाले होते, ज्यांचे दात स्मार्टफोन तोंडावर पडल्याने तुटले होते. यातील अनेकांचे ओठ देखील फुटले होते. स्मार्टफोनचे वजन 170 ग्रॅम ते 250 ग्रॅमपर्यंत असते, यामुळे एवढे वजन चेहऱ्यावर पडल्यावर हॉस्पिटलमध्येच भर्ती व्हावे लागेल.

आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, स्मार्टफोनमुळे चेहरा खराब होत आहे. प्लास्टिक सर्जन डॉ. बोरिस यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, स्मार्टफोनमुळे युवकांच्या चेहऱ्याला दुखापती होण्याच्या घटना वाढत आहेत. बोरिस यांच्याकडे काही दिवसांपुर्वीच एक महिला आली होती, जिचे फोन पडल्यामुळे नाक तुटले होते. अनेक घटनेत फोन फेकून मारल्याने दुखापती झालेल्या आहेत.

याशिवाय चालताना फोनवर मेसेज करताना लोक पडले आहेत, तसेच खांबाला धडकले आहेत.

त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 1998 ते 2017 पर्यंत फोनमुळे इजा झालेले 2500 घटना घडल्या आहेत. फोनमुळे लोकांचे डोक्याला आणि मानेला इजा झालेली आहे. 40 टक्के प्रकरणांमध्ये 13 ते 29 वयोगटातील युवकांचा समावेश आहे.

 

 

Leave a Comment