विद्याच्या ‘शकुंतला देवी’चा नवा टीझर रिलीज


आता मोठ्या पडद्यावर ‘ह्युमन कॉम्प्युटर’, अशी ओळख असणाऱ्या शकुंतला देवींची कथा उलगडणार आहे. या चित्रपटात शकुंतला देवींची भूमिका विद्या बालन साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही झाली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच शेअर करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा आणखी एक टीझर विद्या बालनने शेअर केला आहे.

शकुंतला देवी यांना जागतिक गणित दिवसानिमित्त हा टीझर समर्पित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये ‘गणित अगदी सोप्या पद्धतीने शिकवणारी स्त्री’, अशा ओळी पाहायला मिळतात. शकुंतला देवींचा अवघड असलेले गणित अगदी बोटावर सोडवण्यात हातखंडा होता. त्यामुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर अशी ओळख मिळाली होती.


या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन हे करत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. ‘दंगल’ फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा देखील यामध्ये भूमिका साकारणार आहे. तिचाही या चित्रपटातील लूक शेअर करण्यात आला आहे. सध्या लंडनमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे.

Leave a Comment