कार्तिक-भूमी अन् अनन्याचा ‘पती-पत्नी और’मधील फर्स्ट लूक रिलीज


सध्या बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. संजीव कुमार यांच्या चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटात ‘चिंटू त्यागी’ ही भूमिका कार्तिक आर्यन साकारत आहे. तर, त्याच्या पत्नीच्या रुपात भूमी पेडणेकर दिसणार आहे. नुकताच सोशल मीडियावर या दोघांचाही फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.
First Look release of Kartik-Bhumi and Ananya in ‘pati patni aur woh’
कार्तिकच्या फोटोवर ‘पती’ असे कॅप्शन देऊन त्याचा चिंटू त्यागीच्या रुपातील फोटो शेअर करण्यात आला आहे. ‘लिजिये खतम हो गया इंतजार, आ गये हालात के शिकार’, अशी टॅगलाईनही त्याच्या फोटोवर पाहायला मिळतो.


तर, दुसरीकडे भूमी पेडणेकरचाही लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात शिक्षिकेच्या रुपात ती दिसणार आहे. भौतिकशास्त्राचे पुस्तक तिच्या हातात असल्याचे पाहायला मिळते. तिच्या फोटोवर जरा हाय मेंटेनन्स है हम इमोशनली, अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.


त्याचबरोबर अनन्या पांडेचाही ग्लॅमरस लूक रिलीज करण्यात आला आहे. ‘पती पत्नी मधील ‘वो’ची भूमिका या चित्रपटात ती साकारत आहे. तिच्या पोस्टरवर ये अग्नीपथ है, इसे कोई पार नही कर सकता, अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.


आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या तिनही कॅरेक्टर पोस्टरवरुन ट्रेलरची आतुरता लागली आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. मुद्दस्सर अझीज हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment