‘मिशन मंगल’चा नवा ट्रेलर तुमच्या भेटीला


भारतीय अंतराळ संस्था इस्रोने केलेल्या मिशन मंगळ मोहिमेवर आधारित ‘मिशन मंगल’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षकांची उत्तम पसंती भारताच्या मंगळ मोहिमेचे यश दाखवणाऱ्या या ट्रेलरला मिळाली होती. आता त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा ट्रेलरही नुकताच रिलीज करण्यात आला आहे.


असामान्य स्वप्न साकार करताना येणाऱ्या अडचणी आणि यातून उपाय काढत साध्य केलेल्या यशाची झलक यात पाहायला मिळते. अनेक अपुऱ्या गोष्टीच हातात असतानादेखील या सर्वातून मार्ग काढत या मिशनसाठी वैज्ञानिकांनी केलेली मेहनत यात दिसते.

मंगळयान मोहिमेसाठी महिला आणि भारतीय वैज्ञानिकांनी दिलेले योगदान मिशन मंगल या चित्रपटातून अधोरेखित केले गेले आहे. अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू, नित्या मेनन, शरमन जोशी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Leave a Comment