वीरचक्र पुरस्काराने सन्मानित होऊ शकतात विंग कमांडर अभिनंदन


केंद्र सरकार हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचा वीर चक्र पुरस्कार देऊन सन्मान करू शकते. काही दिवसांपुर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर 27 फेब्रुवारीला अभिनंदन यांनी मिग-21 बाइसनद्वारे पाकिस्तानचे एफ-16 हे लढाऊ विमान पाडले होते. त्यामुळे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.

अभिनंदन यांना वीर चक्र पुरस्काराने सन्मानित केल जाऊ शकते. त्याचबरोबर ज्या पायलट्सनी पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त केली होती त्यांना देखील हवाई दलाचे मेडल मिळू शकते. अभिनंदन यांनी मिग-21 बाइसन विमानाने एफ-16 ने पाडत इतिहास रचला होता.

अभिनंदन यांनी एफ-16 ला पाडताच त्यांचे विमान देखील कोसळले. त्यामुळे त्यांना देखील विमानातून उडी मारावी लागली होती व ते चुकीने पाकिस्तानच्या भागात उतरले. त्यानंतर त्यांना पाकिस्तान सैन्याने पकडले होते. मात्र 60 तासाच्या आतच आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने त्यांना भारताच्या ताब्यात दिले.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने पाकिस्तानच्या सीमाभागातील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली होती. पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते.

वीर चक्र हा भारताचा तिसरा सर्वात मोठा युध्दाच्या वेळी देण्यात येणारा पुरस्कार आहे. पहिल्या क्रमांकावर परम वीर चक्र तर दुसऱ्या क्रमांकावर महावीर चक्र पुरस्कार आहे. अभिनंदन सध्या दुखापतीमधून बाहेर येत आहेत. अभिनंदन यांची बैग्लोर येथील इंस्टीट्यूट ऑफ एयरोस्पेस मेडिसिनतर्फे तपासणी करण्यात येणार आहे.  हे इंस्टीट्यूटचा अभिनंदन पुन्हा उड्डाण घेण्यासाठी अंतिम मंजूरी देईल.

अभिनंदन याआधी हवाई दलाच्या 51 स्कवाड्रन येथे तैनात होते. मात्र काही दिवसानंतर सुरक्षेच्या कारणांमुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले.

Leave a Comment