सोशल मीडियावर का केले जात आहे विद्या बालनचे अभिनंदन ?


सध्या आपल्या आगामी मिशन मंगल आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बॉलीवूडची डर्टी गर्ल विद्या बालन व्यस्त असतानाच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्या बालन गरोदर असल्याच्या चर्चा या व्हिडीओनंतर सुरु झाल्या आहेत.

वांद्रे येथील विद्या बालनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विद्याने यामध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, त्यासोबत तिने डेनिम जॅकेट पेअर केले आहे. अनेकजण या व्हिडीओला पाहून विद्या गर्भवती असल्याचा अंदाज लावत आहेत.


विद्याचे चाहते या व्हिडीओवर अनेक कमेंटही करत आहेत. विद्या प्रेग्नेंट आहे का?, असे एका चाहत्याने लिहिले. तर कुणी, बेबी कपूरसाठी आता आणखी वाट पाहू शकत नाही, असे लिहिले. आता विद्या कुठली गूड न्यूज देणार आहे की नाही, हे तर तिच सांगू शकते. 2012 मध्ये चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याशी विद्या बालनने लग्न केले. या दोघांचे नाते इतर जोडप्यांना ‘कपल रिलेशनशिप गोल्स’ देते.

Leave a Comment