या महिला आहेत सर्वात श्रीमंत सीईओ


गेल्यावर्षी जगात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या महिला सीईओंची यादी वॉल स्ट्रीट जर्नलने शेअर केली होती. आम्ही आज तुम्हाला जगभरातील त्याच श्रीमंत महिला सीईओंबाबत सांगणार आहोत ज्यांना वर्षाकाठी शंभर कोटीहून अधिक पगार मिळतो.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार जनरल मोटर्सच्या मॅरी टी. बॅर्रा यांचे नाव सर्वात जास्त पगार घेणाऱ्या सीईओ म्हणून पुढे आहे. 2018 या वर्षात त्यांना 149.7 कोटी रुपये पगार होता.

मार्लिन ए ह्युसन या सर्वात जास्त पगार घेणाऱ्या महिला सीईओच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. एका वर्षासाठी 146.99 कोटी रुपये एवढा पगार अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी लॉकहेड मार्टिनमध्ये काम करणाऱ्या मार्लिन यांना मिळतो.

जनरल डायनेमिक्स कंपनीत काम करणाऱ्या फेबे एन. नोवाकोविच या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. फेबे यांना वर्षांला 141.52 कोटी रुपये पगार मिळतो.

चौथ्या स्थानावर IBM कंपनीच्या सीईओ वर्जीनिया या आहेत. त्यांना वर्षाला 120.33 कोटी रुपये एवढा पगार मिळतो.

एडेना टी. फ्रेडमॅन यांचे नाव पाचव्या स्थानावर आहे. नॅसडेक कंपनीत त्या सीईओ आहेत. वर्षाला त्यांना 98.45 कोटी रुपये पगार मिळतो.

Leave a Comment