कोपा स्पर्धेदरम्यानचे वक्तव्य मेस्सीला भोवले


ब्यूनस आयर्स – एक मोठी नामुष्की अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सीवर ओढवली आहे. तीन महिन्यापर्यंत फूटबॉल खेळण्यास मेस्सीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याला कोपा अमेरिका स्पर्धेदरम्यान केलेले एक वक्तव्य खूपच महागात पडले आहे.

मेस्सीला कोपा अमेरिकेत खेळल्या गेलेल्या चिलीविरुद्धच्या सामन्यात लाल कार्ड मिळाले होते. त्यानंतर ही स्पर्धा त्याने ब्राझीलसाठी फिक्स केली असल्याचे म्हटले होते. कॉनमेबॉल या संस्थेने ३२ वर्षीय मेस्सीवर या बंदीव्यतिरिक्त ५०००० डॉलर्सचा दंडही ठोठावला आहे. मेस्सीला या बंदीमुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या चिली, जर्मनी आणि मेक्सिको विरुद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.

Leave a Comment