तुम्ही पाहिला आहे का ‘मिशन मंगल’चा प्रोमो?


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित ‘मिशन मंगल’ चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. प्रेक्षकांची ज्याला चांगलीच पसंती मिळाली. अशात अक्षयने आता चित्रपटाचा एक नवा प्रोमो शेअर केला आहे.


महिलांच्या शक्तीचे वर्णन करताना या व्हिडिओमध्ये अक्षय दिसत आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला ये कंगन शोर मचाएगा, एक सपना रात जगाएगा…जितना उँचा हो आसमान, ये सिंदूर उतनी दूर जाएगा, असे शब्द ऐकायला मिळतात. भारताच्या मंगळ मोहिमेच्या यशात महिलांचा असणारा वाटा, मिशन मंगल चित्रपटातून अधोरेखित केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अक्षयने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, विद्या बालन, नित्या मेनन, क्रिती कुल्हारी यांची झलक व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामान्य लोकांच्या असामान्य स्वप्नांची कथा असणाऱ्या या चित्रपटाचे निर्मिती आर. बाल्की यांनी तर जगन शक्ती यांनी दिग्दर्शन केले आहे.

Leave a Comment