यंदा मथुरेतील कान्हा खेळणार क्रिकेट


यंदाच्या श्रावणात मथुरा वृंदावन मधील लाडू गोपाल म्हणजे कृष्ण कन्हैया क्रिकेट खेळणार आहे. या दिवसात कान्हाच्या विविध लीलांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मथुरा वृंदावन मध्ये गर्दी करतात. देशात यंदा वर्ल्ड कप क्रिकेटमुळे वातावरणात अजूनही क्रिकेट भरून राहिले आहे आणि त्याला कृष्णाची मथुरा अपवाद नाही. यंदा लाडू कृष्णाला अर्पण करण्यासाठी क्रिकेटचे छोटे कीट, बॅडमिंटन सेट, कॅरम असे सामान द्वारकाधीश मंदिराबाहेर असलेल्या दुकानातून भरले असून भाविक त्याची जोरदार खरेदी करत आहेत.


येथे येणारे भाविक मनापासून बाळकृष्णाला दरवर्षी श्रावणात खेळाच्या अनेक छोट्या वस्तू अर्पण करतात. कृष्ण चेंडू खेळत असे हे सर्वाना माहिती आहे. त्यामुळे या दिवसांत खेळातले चेंडू अर्पण करण्याची प्रथा जुनी आहे. यंदा त्यात खेळातील क्रिकेट कीट, बॅडमिंटन सेट, कॅरम यांची भर पडली आहे. देवाला एकाच खेळ खेळून कंटाळा येऊ नये म्हणून यंदा विविध खेळ आले आहेत. कान्हासाठी प्रत्येक सिझनला नवीन सामान खरेदी केले जाते. त्यात यंदा खेळाच्या या वस्तू, थंडीत मखमलीची रजई, कांबळे, उन्हाळ्यात खेळातले एसी, पंखे, फ्रीज देवाला अर्पण केले जातात.

यंदा बाजारात आलेल्या क्रिकेट कीट मध्ये बॅट, बॉल आणि विकेट असून या खेळांच्या वस्तूच्या किमती ६० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत आहेत. बॅडमिंटन सेट ३० रुपयात तर कॅरम ५० रुपयात विकले जात आहेत.

Leave a Comment