‘मिशन मंगल’चे अँथम साँग रिलीज


अक्षय कुमार, तापसी पन्नु, विद्या बालन, क्रिती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा यांसारखी तगडी स्टारकास्ट ‘मिशन मंगल’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. या चित्रपटातील पहिले गाणे ‘दिल मे है मार्स’ हे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या गाण्याने इंटरनेटवर सध्या धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटाचे हे अँथम साँग आहे. ‘मिशन मंगल’च्या टीमची मेहनत या गाण्यात पाहायला मिळते. हे गाणे बेनी दयाल आणि विभा सराफ यांनी गायले आहे.

भारतीय वैज्ञानिकांनी ‘मिशन मंगल’ या चित्रपटात मंगळावर जाण्यासाठी कशाप्रकारे अथक मेहनत घेतली, हे दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात शर्मन जोशी, नित्या मेनन यांनीही भूमिका साकारल्या आहेत.

Leave a Comment