
गेल्या बऱ्याच दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘साहो’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साहो’ आणि ‘मिशन मंगल’ यांची बॉक्स ऑफिसवरची टक्कर टळली असल्यामुळे प्रेक्षकांनाही दिलासा मिळाला आहे. आता नुकतेच ‘साहो’चे आणखी एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. श्रद्धा आणि प्रभासचा अॅक्शन अवतार या पोस्टरमध्ये पाहायला मिळतो.
‘साहो’चे नवे पोस्टर तुम्ही पाहिले आहे का ?
प्रेक्षकांची मने जिंकण्यासोबतच चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारे हे पोस्टर आहे. चित्रपटातील अॅक्शन सीनचेच व्हिडिओ आणि फोटो आतापर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. पण चित्रपटातील रोमॅन्टिक पोस्टरही काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांना पाहायला मिळाले. त्यामुळे चित्रपटातील लव्हस्टोरीचा अँगलही समोर आला होता.
Prabhas and Shraddha Kapoor… New poster of #Saaho… Costars Jackie Shroff and Neil Nitin Mukesh… Directed by Sujeeth… 30 Aug 2019 release. #30thAugWithSaaho pic.twitter.com/6zCoE0WZej
— taran adarsh (@taran_adarsh) July 25, 2019
‘साहो’ हा चित्रपट यापूर्वी १५ ऑगस्टला रिलीज होणार होता. मात्र, याच दिवशी अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’, जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हे दोन चित्रपट देखील रिलीज होणार आहेत. त्याचबरोबर ‘सेक्रेड गेम्स २’ ही वेबसीरिजही रिलीज होणार असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर निर्माण होण्याची शक्यता होती. पण आता ‘साहो’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आता ३० ऑगस्टला रिलीज होईल. तसेच, हा चित्रपट तमिळ आणि तेलुगू या भाषेतही रिलीज होणार आहे. सुजित यांचे दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटात श्रद्धा आणि प्रभासशिवाय निल नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे आणि महेश मांजरेकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
