तुम्ही पाहिला आहे का विद्या बालनचा ‘टाक-टूक’ व्हिडिओ


टीक टॉकच्या जमान्यात आपला टाक टूक व्हिडिओ बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने बनवला आहे. तुम्हालाही जो पाहून हसू अवरणार नाही. विद्याने आपल्या इन्स्टाग्रामवरून ‘काही टाक-टूक टाईमपास’ असे कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिने व्हिडिओमध्ये लाल रंगाची साडी घातली असून विद्याने पारंपारिक वेशभूषेत डोक्यावर पदर घेतला आहे. लग्नाआधी आणि लग्नानंतर मुलीत होणारे बदल तिने अगदी विनोदी पद्धतीने सांगितले आहेत. प्रत्येक मुलीत शास्त्रानुसार लग्नाआधी ९ देवींचा निवास असतो. पण लग्नानंतर तिच्यातील कोणती देवी प्रकट होईल, हे नवऱ्याच्या कर्मावर अवलंबून आहे, अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे.


प्रेक्षकांची चांगलीच पसंती विद्याच्या या विनोदी व्हिडिओला मिळताना दिसत आहे. या व्हिडिओला अवघ्या दोन तासात १.३५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Leave a Comment