आयुष्मानने का बरी नेसली असेल साडी


नुकताच आर्टिकल १५ चित्रपटातून अभिनेता आयुष्मान खुराणा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आपल्या या चित्रपटातील डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत त्याने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर तो पुन्हा एकदा आगामी चित्रपटांसाठी सज्ज झाला आहे. आपल्या एका फोटोमुळे सध्या आयुष्मान चर्चेत आहे. त्याने या फोटोत निळ्या रंगाची साडी घातली आहे. त्याने यासोबतच हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घेतल्या आहेत. त्याने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये ‘ड्रीम गर्ल’ आणि साडी ट्विटर असे हॅशटॅग दिले आहेत. आयुष्मानने साडीतील फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. डिसेंबर महिन्यात त्याने याआधीही पिवळ्या रंगाच्या साडीतील आपला एक फोटो शेअर केला होता.


त्याने त्यावेळी आपल्या आगामी ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचे हे पहिलं पोस्टर असल्याचे म्हटले होते. त्याच्यासोबत या चित्रपटात ‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री नुशरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे. तर अन्नू कपूर आणि मनजोत सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करणार असून राज शांडिल्य यांचे दिग्दर्शन असणार आहे. येत्या १३ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी येत आहे.