हार्दिक पांड्याच्या एका शर्टाची किंमत चक्क एक लाख रुपये !


क्रिकेटपटू हार्दिक पांड्या नेहमीच त्याच्या हटके ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेचा विषय ठरत आला आहे. केवळ क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीमुळेच नाही, तर मैदानाबाहेरही हार्दिक अनेक गोष्टींमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असतो. हार्दिकच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल बोलायचे झाले, तर त्याला नवनव्या स्टाईलचे कपडे वापरण्याचा शौक असल्याचे दिसून येते. त्यामुळे हार्दिकची ड्रेसिंग स्टाईल लक्षवेधी आणि सर्वात हटके असते.

आपल्या पेहरावाच्या सोबत त्याबरोबर अनेक अॅक्सेसरीज परिधान करणेही हार्दिकला प्रिय असून, पोशाख कोणताही असो, त्याबरोबर त्याच्या गळ्यामध्ये त्याच्या आवडत्या चेन्स, पोशाखाला साजेलसे गॉगल्स हार्दिकचा ‘ट्रेडमार्क’ ठरत असतात. अलीकडेच हार्दिकने ‘लुई व्हितॉ पॅरीस’ या आंतरराष्ट्रीय ब्रँडचा शर्ट परिधान केला होता. हा एक रेग्युलर फिट शर्ट असून, त्यावर ब्रँडचे खास ‘लुई व्हितॉ’ प्रिंट होते. हा शर्ट लाईटवेट सिल्कचा वापर करून बनविण्यात आला असून, यावर ‘मदर ऑफ पर्ल’ बटन्स म्हणून लावण्यात आले आहेत. अशा या खास शर्टची किंमतही तितकीच खास आहे.

हार्दिकने परिधान केलेला शर्ट ‘लुई व्हितॉ’च्या वेबसाईटवर ही खरेदीसाठी उपलब्ध असून, वेबसाईटवर या शर्टची किंमत १,४७० डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनामध्ये पाहिले तर या शर्टाची किंमत एक लाख रुपयांच्या आसपास आहे ! आता हटके स्टाईल हवी, म्हणजे कपडेही हटकेच हवेत, नाही का?

Leave a Comment