Breakfast Tips : सकाळी किती वाजता करावा नाश्ता? जाणून घ्या योग्य वेळ


न्याहारी, ज्याला आपण ब्रेकफास्ट किंवा नाश्ता म्हणून देखील ओळखतो, हे दिवसातील सर्वात महत्वाचे जेवण आहे. सकाळी नाश्ता केल्याने तुमचे शरीर दिवसभर सक्रिय आणि उत्साही राहते. याच्या मदतीने तुम्ही तुमची रोजची कामे सहज पूर्ण करू शकता. तुमचा नाश्ता कधीही चुकवू नका, असे आरोग्य तज्ज्ञ अनेकदा सांगतात. बहुतेक लोक नाश्ता करतात, पण तुम्हाला माहीत आहे का की तो खाण्याचीही एक वेळ असते.

होय, असे बरेच लोक आहेत, ज्यांना सकाळी नाश्ता किती वाजता करावा हे माहित नसते. चला सकाळचा नाश्ता खाण्याशी संबंधित सर्वात महत्वाचे नियम जाणून घेऊयास, जे तुम्हाला दिवसाच्या पहिल्या जेवणापासून पुरेसे पोषण मिळण्यास मदत करतीलच शिवाय तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवतील.

तज्ज्ञांच्या मते, तुम्ही सकाळी उठल्यावर त्याच्या तासाभरात नाश्ता करा. या काळात शरीरातील चयापचय क्रिया उच्च राहते आणि यामुळे स्नायूंना कमी नुकसान होते. याशिवाय सकाळी लवकर नाश्ता करण्याचाही फायदा होतो. यामुळे दिवसभरात पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. याच्या मदतीने तुम्ही अति खाणे टाळू शकता.

न्याहारी उशिरा केल्याने थकवा जाणवू शकतो, असेही आरोग्य तज्ज्ञ सांगतात. याचा तुमच्या चयापचयावरही परिणाम होतो.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की ज्या लोकांना वेळेवर भूक लागत नाही, त्यांना यकृत आणि आतड्यांशी संबंधित समस्या असू शकतात. तुम्ही सकाळी काही खाल्ल्याने तुमची पचनशक्ती वाढते. यामुळे तुमचे यकृत देखील उत्तेजित होते. सकाळी नाश्ता न केल्याने तुमच्या आतडे आणि यकृतावर वाईट परिणाम होतो.

नाश्त्यासाठी काय खावे

  • सकाळच्या न्याहारीमध्ये हलके अन्न समाविष्ट करा, ज्यामध्ये दलिया, पोहे किंवा खिचडी असू शकते.
  • नाश्त्यात प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नका
  • जास्त साखर असलेले पदार्थ खाणे टाळा
  • पचनाशी संबंधित समस्या असलेल्यांनी सकाळी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये.