E-Aadhaar Password : अचानक पडली आधारची गरज? PDF कशी उघडायची ते ठेवा लक्षात


आपल्याकडे नेहमीच आधार कार्ड असणे आवश्यक नाही, परंतु तुम्हाला अचानक आधार कार्ड हवे असल्यास तुम्ही काय कराल? UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करु, असे तुम्ही म्हणाल. पण तुम्हाला माहिती आहे का की ई आधार डाउनलोड केल्यानंतर 8 अंकी पासवर्ड आवश्यक आहे?

या 8 अंकी पासवर्ड शिवाय तुमची ई-आधार कार्ड PDF फाईल उघडणार नाही, आता इथे प्रश्न पडतो, हा 8 अंकी पासवर्ड काय आहे? डाउनलोड केल्यानंतरही ई-आधार उघडत नसल्याची तुम्हाला काळजी वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला हे कसे सहज शोधू शकता याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देतो.

UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) च्या अधिकृत साइटनुसार, जर तुम्ही डिजिटल कॉपी डाउनलोड केली किंवा आधार कार्डची ई-कॉपी म्हणा, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी पासवर्ड वेगळा आहे.

अचानक गरज पडल्यास, अर्थातच प्रत्येकजण आधारच्या अधिकृत साइटवरून ई-आधार डाउनलोड करतो, परंतु पासवर्ड माहित नसल्यामुळे त्रास होतो. ई-आधार उघडण्याची पद्धत UIDAI च्या अधिकृत साइटवरील उदाहरणाद्वारे स्पष्ट केली आहे.

पीडीएफ फाईलचा पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे. पहिल्या चार अक्षरांशिवाय तुमचा जन्म कोणत्या वर्षी झाला, हे टाकावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुमचे नाव विनोद पडेलकर असेल आणि तुमचे जन्म वर्ष 1992 असेल, तर तुमच्या ई-आधार कार्ड PDF फाइलचा पासवर्ड VINO1992 असेल. हा 8 अंकी पासवर्ड टाकताच तुमची PDF फाईल उघडेल.