पवारांनी उद्धव ठाकरेंना फटकारले … एक तरी निवडणूक लढली का?

नाशिक   राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकेची तोफ डागणारया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पवारांनी फटकारले आहे , मी १४ निवडणुका लढविल्या आहेत आणि त्या जिंकल्याही आहेत. तुम्ही एक तरी निवडणूक लढविली का ?अशा शब्दात पवारांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. 

नाशिकमध्ये पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपने प्रचाराची पातळी सोडली असून त्यांच्याकडे विकासाबाबत कोणताही अजेंडा नसल्याची टीका केली.जनतेवर मोदींचा भडीमार सुरु आहे पण जनताच ठरविणार कुणाला मत द्यायचे असे स्पष्ट करून पवार यांनी भाजपला लोकशाही पद्धतच माहित नसल्याचा आरोप केला. 

भाजप… तमाशातील ‘प्रधान’जी 
निवडणुकीआधीच पंतप्रधान कसे होणार ? असा सवाल करून भाजपची अवस्था तमाशातील ‘प्रधान’जी प्रमाणे होणार असल्याचे पवार म्हणाले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी अभ्यास करून योजना आणल्या ,कर्जमाफीही दिली. योग्य दरात कर्जेही दिली ,शेतीमालाला हमी भाव वाढवून दिला म्हणून भाजपने संसदेचे कामकाज बंद पाडले असा दावाही त्यांनी केला.