
निलेश राणेंचा प्रचार न करण्याच्या आपल्या निर्णयावर कार्य़कर्त्यांशी विचार विनिमय करून आमदार केसरकर यांनी उद्या शरद पवारांच्या होणाऱ्या सभेलाही जाणार नसल्याचे सांगितले आहे. आमदार केसरकर यांच्या या ताठर भुमिकेने आता उद्या शरद पवार काय कारवाई करणार याची चर्चा सुरू आहे. कालच अजित पवारांनी आघाडीचा धर्म पाळा अन्यथा कारवाई केली जाईल असे सांगुनही केसरकर आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
