नाशिक : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागलेल्या आदर्शप्रकरणी क्लीन चिट देण्यासाठी नेतेमंडळीत आता रेस लागली आहे. दोनच दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांनी क्लीन चिट दिली होती. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही नाशिक येथील पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांना याप्रकरणी क्लीनचिट दिली आहे.
चव्हाणांच्या नातलगांचा आदर्श सोसायटीत फ्लॅट असणे, हा फार मोठा भ्रष्टाचार नाही, असे शरद पवार यांचे म्हणने आहे. दोनच दिवसापूर्वी काही पत्रकारांनी सोनिया गांधी यांना विचारले असता त्यांरनी अशोक चव्हाण यांच्याच उमेदवारीचे समर्थन केले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनीही चव्हाणांची पाठराखण केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी हे वक्तव्य केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या आदर्श प्रकरणावर आता पडदा टाकण्यासाठी व विरोधकांचे आरोप पलटवून लावण्यासाठी आघाडीचे नेते एकवटल्यााचे चित्र आहे. त्या्मुळे आता आगामी काळात सत्ताधा-यांना आदर्श प्रकरणाचे समर्थन करण्याचा चंग बांधलेला दिसत आहे.