मोहन रावले राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या वाटेवर असेलले शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले हे आगामी काळात राष्ट्रवादी कॉग्रेसमध्येर प्रवेश करणार असल्याचे समजते. याचसंबंधी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचा प्रवेश निश्चीत मानला जात आहे.

रावले आगामी काळात लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. मनसेकडून दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केली होती. पण राज ठाकरे यांनी आपले विश्वासू बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे रावले यांनी राष्ट्रवादीचा मार्ग धरला असल्यासचे समजते.

गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेनेचे खासदार असलेले मोहन रावले यांनी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्यासोबतच शिवसेना नेतृत्वावर टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावमुळे ते कोणत्याो पक्षात प्रवेश करणार याकडे लक्ष लागले होते.