रैना-विराटच्या खेळीने टीम इंडिया विजयी

ढाका: सुरेश रैना-विराट कोहलीच्यां दमदार खेळीने टीम इंडियाने दुस-या सराव सामन्यात इंग्लंडवर २० धावांनी विजय मिळवला. या सराव सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी १७९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकांत ६ बाद १५८ धावा करता आल्या. आता शुक्रवारी टीम इंडियाची गाठ पाकिस्तान सोबत होत आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. टीम इंडियाकडून दमदार फलंदाजी करताना उपकर्णधार विराट कोहलीने नाबाद ७४ तर रैनाने ५४ धावा केल्या. त्यांगना रवींद्र जाडेजाने दोन तर अश्विन, शमी, भुवनेश्वर आणि रैनाने प्रत्येकी एक विकेट् घेत मदत केली.

दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाला ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता टी-२० विश्वचषकात २१ मार्चला टीम इंडियाचा पहिला साखळी सामना असेल तो कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment