खासदार शेट्टी धर्मनिरपेक्ष मतांना मुकतील- पाटील

नवी मुंबई: दोनच दिवसापूर्वी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेना- भाजप व रिपाईच्यान महायुतीला साथ दिली आहे. राजू शेट्टी आणि स्वाभिमानी संघटना महायुतीसोबत सहभागी झाल्यााने ते आता धर्मनिरपेक्ष मतांना मुकेल असा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला आहे.

आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईत क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील नवी मुंबईतल्या क्रीडा महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. याशिवाय पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी गृहमंत्री पाटील यांनी दर्शवली आहे.

दरम्यान, यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार यांच्या माढा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यायमुळे आता राष्ट्रनवादी पक्षातील कोण-कोण लोकसभा निवडणूक लढविणार याकडे सर्वांचे लक्ष लगाले आहे.