मोदींवर राज ठाकरेंचा हल्लाबोल

नाशिक- दोन दिवसापासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौ-यावर आहेत. त्या ठिकाणी ते इच्छू-क असलेल्याूचे मते जाणून घेत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी यांना पीएमपदासाठी आपला तूर्तास पाठिंबा नसल्याचे म्हणत मोदींवर हल्लाबोल केला आहे. ‘दोस्त दोस्ता ना रहा’ म्हणत राज ठाकरेंनी मोंदी यांच्यावर टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या चार दिवसांच्या दौ-यावर आहेत.

दोन महिन्याकपूर्वी भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित केल्याधनंतर गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असं राज ठाकरे म्हणाले. मुंबईत येवून गुजरातींचं कौतुक करण्यापेक्षा आता संपूर्ण देशाचा विचार मोदींनी करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
नरेंद्र मोदींचं गुजरातमधील कार्य मोठं आहे. मात्र त्यांनानरेंद्र मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याबद्दल महाराष्ट्रात येवून बोलण्यापेक्षा राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्यापुतळ्याबद्दल का बोलले नाही, असा सवालही राज ठाकरेंनी मोदींना विचारला.

Leave a Comment