सोनिया गांधी जगातील शक्तिशाली महिला

न्यूयॉर्क – यंदाच्या फोर्ब्स मासिकाने केलेल्या जगातिल सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव तिसर्‍या स्थानावर आहे. फोर्ब्सच्या या यादीत सोनिया शक्तिशाली लोकांच्या यादीत 21 स्थानावर आहेत. या यादीतील शक्तिशाली महिलांचा विचार करता जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल पहिल्या आणि ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ या दुसर्‍या स्थानावर आहेत. या यादीत 72 राजकारणी, राष्ट्रप्रमुख तसेच मोठ्या उद्योगपतींना स्थान देण्यात आले आहे.

जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भारत हा दुसर्‍या क्रमांकावरील देश आहे. या देशावर सत्ताधारी पक्षाच्या सोनिया गांधी यांचे नेतृत्व आहे, अशी ओळख करुन देत त्यांना हा क्रमांक देण्यात आला आहे. जगभरातील शक्तिशाली व्यक्तींमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन पहिल्या स्थानावर आहेत. पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना मागे टाकत पहिला स्थान मिळविले आहे. या यादीत अँजेला मर्केल पाचव्या स्थानावर आहेत. पहिल्या दहा व्यक्तींमध्ये मर्केल या एकमेव महिला आहेत. भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग 28 व्या स्थानावर आहेत. तर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी 38 व्या स्थानी आहेत.